टेलिव्हीजन, चित्रपटांबरोबरच सध्या मनोरंजनाचं सशक्त माध्यम म्हणजे ओटीटी. ओटीटीवर प्रदर्शित होणारे शो, वेबसीरिज पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल अधिक वाढला आहे. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘दहावी अ’ वेबसीरिज. ITSMAJJA च्या ‘दहावी अ’ वेबसीरिजने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. ‘आठवी अ’ वेबसीरिजला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. प्रेक्षकांचं वेबसीरिजवर असणारं प्रेम पाहून ‘दहावी अ’ची कल्पना पुन्हा उदयाला आली. ‘दहावी अ’ने आता महाराष्ट्रभर कमालीचं नाव कमावलं आहे. सध्या या वेबसीरिजची टीम मुंबईमध्ये धमाल-मस्ती करत आहे. रविवारी तर ‘दहावी अ’चे कलाकार मुंबई इंडियन्सच्या लाइव्ह शोमध्ये उपस्थित होते. आता ही टीम दादरच्या चैत्यभूमीमध्ये पोहोचली आहे. (dahavi a webseries actors)
मुंबई इंडियन्सच्या लाइव्ह शोमध्ये ‘दहावी अ’च्या कलाकारांनी अक्षरशः दंगा घातला. मुंबई इंडियन्सने सामना जिंकल्यानंतर मुलांना आनंद अनावर झाला. स्टुडिओमध्येच सगळ्यांनी एकच जल्लोष केला. मुंबई इंडियन्सशी अशाप्रकारे जोडलं जाणं आणि थेट स्टुडिओमध्ये बसून संवाद साधणं ‘दहावी अ’साठी मोठी संधी होती. आता हे सगळे कलाकार १७ एप्रिलला मुंबई इंडियन्सच्या वानखेडे स्टेडिअमध्ये होणाऱ्या सामन्यामध्ये हजेरी लावणार आहेत. दरम्यान कलाकारांना क्रिकेटपटूंना जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.
आणखी वाचा – ‘दहावी-अ’ची टीम पहिल्यांदाच मुंबई जवळून पाहताना…; राणीची बाग ते मुंबई इंडियन्सबरोबर धमाल
‘दहावी अ’चे कलाकार पहिल्यांदाच मुंबई दर्शन करत आहेत. आता ते थेट दादर येथील चैत्यभूमीमध्ये पोहोचले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सृष्टी, संयोगिता, अथर्व, ओम, श्रेयस, सत्यजीत, रुद्र यांनी चैत्यभूमीमध्ये जाऊन दर्शन घेतलं. चैत्यभूमीच्या आजूबाजूच्या वातावरणाचा आनंद घेतला. तसेच मुंबईचा समुद्रकिनारा अगदी जवळून अनुभवला. ‘दहावी अ’च्या कलाकारांसाठी हा संपूर्ण अनुभव सुखावणारा होता.
पाहा व्हिडीओ
आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडने वर्षभराने पहिल्यांदाच दाखवला लेकाचा चेहरा, नावही ठेवलं खूपच खास, पाहा Video
विशेष म्हणजे चैत्यभूमीमध्ये ही मुलं जेव्हा गेली तेव्हा त्यांना चाहत्यांनी घेरलं. फक्त गावाकडेच ही सीरिज पाहिली जाते हा समज कलाकारांनी यावेळी मोडित काढला. मुंबईसारख्या शहरात ‘दहावी अ’च्या कलाकारांना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. आम्ही ही वेबसीरिज नेहमी बघतो, ‘आठवी अ’ पासून आम्ही या वेबसीरिजचे चाहते आहोत अशाप्रकारच्या भावना यावेळी चाहत्यांनी व्यक्त केल्या. हा अनुभव ITSMAJJA व ‘दहावी अ’च्या कलाकारांच्या कामाची पोचपावती होता.