रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आठवी-अ’ व ‘पाऊस’च्या भरघोस यशानंतर लवकरच नवी वेबसीरिज येणार, मुहूर्त सोहळा संपन्न

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 10, 2024 | 9:33 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
itsmajja and media one solutions coming another web series muhurta ceremony completed

‘आठवी-अ’ व ‘पाऊस’ या वेबसीरिजनंतर आता इट्स मज्जाची आणखी एक नवीन सीरिज, नुकताच पार पडला मुहूर्त सोहळा

गेल्या अनेक वर्षांपासून ‘इट्स मज्जा’ने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हमी घेतली आहे आणि या हमीपूर्ततेसाठी ‘इट्स मज्जा’ कायमच प्रेक्षकांसाठी मनोरंजक आणि नवनवीन कलाकृती घेऊन येत असतात. गेल्या अनेक वर्षात ‘इट्स मज्जा’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अशा अनेक नवनवीन कलाकृती घेऊन आल्या आहेत. मनोरंजन क्षेत्रातील विविधता ‘इट्स मज्जा’ने कायमच जपली असून याच विविधतेमुळे ‘इट्स मज्जा’ने अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे चाहतेही ‘इट्स मज्जा’च्या प्रत्येक कलाकृतीसाठी वाट पाहत असतात. ‘इट्स मज्जा’ गेली अनेक वर्षे प्रेक्षकांसाठी मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक घडामोडी पोहोचवत आहेत. (itsmajja new series mhurta ceremony)

मनोरंजन क्षेत्रातील वार्तांकनाबरोबरच ‘इट्स मज्जा’ने आणखी एक पाऊल टाकले ते निर्मितीचे…. गेल्या वर्षभरात ‘इट्स मज्जा’ने ‘आठवी-अ’ आणि ‘पाऊस’ या लोकप्रिय सीरिजची यशस्वी निर्मिती केली आहे. त्यानंतर आता ‘इट्स मज्जा’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणखी एक सीरिज घेऊन येत आहे. नुकतंच या सीरिजचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला आहे. ‘इट्स मज्जा’चे शौरीन दत्ता यांनी मुहुर्ताचा नारळ फोडत या नवीन सीरिजचा श्रीगणेशा केला. याचे काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Video : सूरज चव्हाणला भेटताच ‘ती’ मुलगी ढसाढसा रडू लागली अन्…; अजूनही झापुक झुपूकचं क्रेझ, व्हिडीओ व्हायरल

‘इट्स मज्जा’च्या या आगामी नवीन सीरिजमध्ये प्रेक्षकांना काय नवीन पाहायला मिळणार? या सीरिजमधून नक्की कोणता विषय मांडण्यात आला आहे? आणि या सीरिजमध्ये कोणते कलाकार पाहायला मिळणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तसंच ही नवीन सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार? याबद्दलची माहितीही अजून समोर आली नाही. पण ‘इट्स मज्जा’च्या ‘आठवी-अ’ आणि ‘पाऊस’ या सीरिजची लोकप्रियता पाहता प्रेक्षक आगामी सीरिजसाठीही उत्सुक आहेत हे नक्कीच…  

आणखी वाचा – वडिलांना कॅन्सर झाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीकडे उपचारासाठीही पैसे नाहीत, मदतीचं आवाहन, भावुक व्हिडीओ समोर

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘इट्स मज्जा’ने ‘आठवी-अ’ ही सीरिज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. या सीरिजला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या सीरिजमध्ये डोंगरावरच्या छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या अभिजीत व त्यांच्या खास मित्रांची साधी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी प्रेक्षकांना भावली. त्यानंतर ‘इट्स मज्जा’ प्रेक्षकांसाठी ‘पाऊस’ ही सीरिज घेऊन आली. या वेबसीरिजमधून प्रेमाचं एक अल्लड नातं उलगडणाऱ्या सायली आणि विशालची लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.

Tags: itsmajja new seriesitsmajja new series celebrationitsmajja new series mhurta ceremony
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Baba Siddiqui murder case accused shooter plan to kill Salman Khan see the details

बाबा सिद्दीकीआधी सलमान खानला मारायचं होतं पण...; शूटरने स्वत:च केला खुलासा, सांगितला संपूर्ण प्लॅन

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.