अभिनेता उदित नारायण यांच्या इमारतीमध्ये आग लागण्याची बातमी समोर आली आहे. या घटणेमध्ये आता त्यांच्या एका शेजाऱ्याचादेखील मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ जानेवारीला रात्री ९.१५ वाजता अंधेरी येथील शास्त्रीय नगरमधील उदित नारायण यांची इमारत ‘स्कायपॅन’ अपार्टमेंटमध्ये आग लागली होती. काही वेळातच ही आग झपाट्याने वाढली आहे. त्यानंतर आगीने रौद्ररुप धारण केले. यामध्ये अनेक रहिवाश्यांना वाचवण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर समोर आल्याने हळहळ व्यक्त केली आहे. नक्की काय झालं आहे? ते आपण जाणून घेऊया. (udit narayan building fire)
याबद्दलची माहिती विक्की लालवानी यांनी सोशल मीडियावर दिली आहे. त्यांनी सांगितले की त्या विंगमध्ये ११ व्या मजल्यावर राहणारे उदित यांचे शेजारी राहुल मिश्रा यांचे कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टमध्ये मुंबई फायर ब्रिगेड मुख्यालयाने या व्यक्तीच्या मृत्यू झाल्याच्या घटणेवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांनी रिपोर्टमध्ये सांगितले की, “घटनास्थळी असलेल्या लोकांपैकी एकाने घरांमध्ये कोणीतरी दिवा लावला होता. ज्यामुळे आग लागली होती”.
राहुल मिश्रा यांची पत्नी मदतीसाठी खाली धावू लागली. तसेच जोपर्यंत लोक तिथे मदतीसाठी पोहोचले तोपर्यंत उशीर झाला होता. आधीदेखील २५ डिसेंबर रोजी गायक शानच्या इमारतीमध्येही आग लागण्याची घटना समोर आली होती. मुंबईमधील वांद्रे येथील फॉर्च्युन एन्क्लेव्ह इमारतीमध्ये भयंकर आग लागली होती. ज्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसानदेखील झालं होतं.
आणखी वाचा – जुई गडकरीच्या ‘त्या’ फोटोचा गैरवापर, अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “असे दुसऱ्याचे फोटो…”
त्यावेळी शानने सांगितले की, “इमारतीमध्ये सातव्या मजल्यावर रात्री १२.३० वाजता आग लागली होती. सुमारे एक वाजता त्यांचे डोळे उघडले त्यावेळी खूप धूर तयार झाला होता. सगळ्यांना छतावर जाण्यास सांगितले मात्र दरवाजा बंद होता. त्यामुळे तो १४ व्या मजल्यावर शेजाऱ्यांच्या घरी थांबला होता. ही आग विझवण्यासाठी सुमारे अडीच तास लागले होते.