अभिनेत्री सुरुची अडारकर सध्या विशेष चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच सुरुची अडारकरने पियुष रानडेसह लगीनगाठ बांधली. सुरुची व पियुष यांच्या लग्नाचे फोटो अचानक समोर आल्याने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटोस सोशल मीडियावरून चांगलेच व्हायरल झाले. सुरुची व पियुषच्या लग्नामुळे ही जोडी सध्या चर्चेत आली आहे. सुरुची व पियुष यांच्या लग्नातील पारंपरिक लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. लग्नानंतर सुरुची डिनरला बाहेर गेली असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. (Suruchi adarkar and sukanya kulkarni)
अभिनेत्री सुरुची अडारकर ही कुलकर्णी कुटुंबियांसह फिरायला गेली असल्याचं समोर आलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत त्यांनी एकत्र फोटो शेअर केले आहेत. सुरुची सुकन्या कुलकर्णी व ज्युलिया कुलकर्णी यांच्यासह फिरायला गेली असल्याचं समोर आलं आहे. तिघीनींही बाहेर फिरायला गेल्यावरचे अनेक फोटो शेअर केले आहेत. सुरुचीने शेअर केलेल्या ज्युलिया व सुकन्या यांच्याबरोबरच्या डिनर डेटच्या फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सुरुचीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ज्युलियाला पाहणं रंजक ठरतंय. सुकन्या मोने यांची लेक ज्युलिया इंडस्ट्रीमध्ये फार कमी सक्रिय असते. कित्येक दिवसांनी आज ज्युलियाचा लूक समोर आला आहे. सुरुचीने ‘माय मंचकीन’ असं कॅप्शन देत ज्युलियाचा फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या डिनर डेटमध्ये पियुष दिसत नाही आहे. याशिवाय सुरुची व पियुष यांनी श्रेया बुगडे व तिच्या पतीसहदेखील डिनर डेटला हजेरी लावली होती.
सुरुचीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे “आनंदाचा दिवस” असं म्हणत लग्नाचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये दोघांचा पारंपरिक लूक लक्षवेधी ठरला. सुरुचीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तसेच तिच्या दागिन्यांनीही विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. पियुषने लग्नासाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. या कुर्त्यावर पिवळ्या रंगाचं घेतलेल उपरणं आकर्षक होतं.