सिनेविश्वातील एक गोड आणि लोकप्रिय कपल पैकी एक म्हणजे अभिनेत्री इशा केसकर आणि अभिनेता ऋषी सक्सेना. गेल्या अनेक वर्षांपासून इशा आणि ऋषी एकमेकांना डेट करत आहेत. रोमँटिक कपलपैकी एक असलेल्या या जोडीचं बॉण्डिंगही खूप क्युट आहे. इंस्टाग्राम वरून हे दोघे त्यांचे अनेक व्हिडीओ, फोटोस नेहमीच पोस्ट करत असतात. चाहतेही त्यांच्या या फोटो, व्हिडीओवर भरभरून प्रेम करत असतात.(Isha Keskar video Viral)
अशातच इशाने ऋषी सोबतचा एक व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केला आहे, यांत इशा आणि ऋषी यांचा एकमेकांसोबतचा एक व्हिडीओ पाहायला मिळतोय. मात्र या व्हिडिओमध्ये इशा ऋषीला घराबाहेर काढताना दिसतेय. इंस्टाग्राम वर सध्या सुरु असलेला ट्रेंड इशाने सुद्धा केला आहे. यशाने ऋषीला दोन चिट्ट्यांमधून विचारलं की, यापैकी एक निवडायची आहे. त्या दोन चिट्ट्यांमध्ये इशाने एका चिट्टीत लिहिलं आहे, कोफी @होम, आणि दुसऱ्या चिट्टीत लिहिलं आहे, कॉफी @ आऊटसाइड. त्यात ऋषीने कॉफी @आऊटसाइड ही चिट्टी निवडली असून त्याला असं वाटण साहजिकच आहे की इशा आता त्याला कॉफी साठी बाहेर कुठेतरी घेऊन जाईल.
पाहा का काढलं इशाने ऋषीला घराबाहेर (Isha Keskar video Viral)
मात्र इशाने ऋषीला कॉफी बनवून दिली आणि त्याला घराबाहेर काढलं, असा होता इशाचा कॉफी @ आऊटसाइड प्लॅन. इशा आणि ऋषीचा हा मजेशीर व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. शिवाय इशाने ऋषीला धक्के मारून घराबाहेर काढलं आहे, त्यामुळे ऋषीने या व्हिडिओला लाईफ में पुश चाहिये.. पर इतना? असं म्हणत कॅप्शन दिल आहे. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.(Isha Keskar video Viral)
हे देखील वाचा – प्रार्थनाचा मराठमोळा अंदाज श्रेयसच्या कमेंटने वेधलं लक्ष
काहे दिया परदेस या मालिकेतून ऋषी सक्सेनाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. शिवाय ऋषीने ऐतिहासिक सिनेमांमध्येही काम केलं आहे. लवकरच ऋषी सुभेदार या त्याच्या आगामी चित्रपटातून मोठा पडदा गाजवायला सज्ज होणार आहे. तर जय मल्हार या मालिकेतील बानुबया मुळे इशा केसकर हिला लोकप्रियता मिळाली. या शिवाय इशाची शनाया ही भूमिका विशेष गाजली. हल्ली ती ओंकार भोजने सोबत सरला एक कोटी या चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसली.
