महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. या कार्यक्रमाची चर्चा सातासमुद्रापार झालेली आपण पहिली. या कार्यक्रमातील कलाकारांनी सादर केलेल्या स्कीटमुळे कलाकार देखील तेवढेच फेमस झाले आहेत. हास्यजत्रेतील काही कलाकार हे आपल्याला पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेत देखील पाहायला मिळाले.हास्यजत्रा या कार्यक्रमातील विनोदी कलाकार ईशा डे हिने नुकतीच तिच्या इंस्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली आहे. तिने पोस्ट केलेल्या फोटोला नेगिटिव्ह कमेंट आल्यामुळे तिने त्या कमेंटला उत्तर दिल आहे.
ईशाने पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेचे दिग्दर्शक अद्वैत पुरोहित आणि या कार्यक्रमाचे निर्माते सचिन गोस्वामी यांच्या सोबतचे फोटो शेअर केले आहेत.. या फोटोला तिने “Every story has an end. But every ending is a new beginning too!” Here’s to hope!! I miss the office and I miss you all Team POUA! See you again soon! असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टवर एका व्यक्तीने “मराठी कलाकार समाजमाध्यमांवर व्यक्त होताना English का वापरतात कुणास ठाऊक? इतका संकोच वाटत असेल का? तुमची पोस्ट पाहणारे 90-95% लोकं मराठी आहेत. बघा पटलं तर घ्या, बाकी तुमची इच्छा.” असे म्हंटले आहे.
ईशाने देखील या फोटोला उत्तर देत म्हंटल आहे “संकोच वाटत असता तर मराठी भाषेमध्ये काम तरी का केला असत सर? Also my language of expression is usually English आणि मला त्याचा ही संकोच वाटत नाही. बरं आणि माझी Post पाहणारे 90-95 % लोक मराठी आहेत हे तुम्ही कसं ठरवलं ह्याची मला कल्पना नाही.. पुढे तिने म्हटलंय P.s. म्हणजे तळटीप असं म्हणत तुम्ही मराठी/देवनागरी मध्ये लिहलेला “पोस्ट” हा शब्द पण इंग्रजी भाषेतला आहे. असा मिश्किल भाषेत टोमणा देखील मारला आहे. पुढे तिने thank you म्हणत त्याचे आभार देखील मानले आहेत. तर ईशाने शेअर केलेली ही पोस्ट तुम्ही पाहिलीत का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.