मराठी सिनेसृष्टीमध्ये सर्व भूमिकांसाठी एक आदर्श निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अलका कुबल.अनेक चित्रपट, मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अलका कुबल यांनी एक काळच गाजवला आहे हे सर्वच जाणतात. पण काळाच्या ओघात त्या मागे पडल्या नाहीत याबाबत त्यांचं विशेष कौतुक आहे. आज ही त्या त्यांच्या अभिनयाने तितक्याच उत्साहाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. (Alka kubal Maherchi Saree)
परंतु प्रत्येक कलाकाराची एक अशी कलाकृती असते जी त्या कलाकाराला कायमची ओळख बनवून देते. आणि त्या कलाकाराचं नाव आलं की त्या एका चित्रपटाची, मालिकेची किंवा नाटकाची नक्की आठवण होते. असच अलका कुबल यांनी अनेक चित्रपट, मालिका केल्या आहेत पंरतु त्यांचं नाव आलं की माहेरची साडी या त्यांच्या चित्रपटाची आठवण आल्या शिवाय राहत नाही.त्यांच्या आणि अगदी मराठी सिनेसृष्टीतील टर्निग पॉईंट असा हा चित्रपट आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
पहा काय होता किस्सा ? (Alka kubal Maherchi Saree)
माहेरची साडी या चित्रपटाने अलका कुबल यांना घराघरात पोहोचवलं. त्यांच्या नावाला ओळख मिळवून दिली. पण ही झाली पडद्यावरची गोष्ट. हे सगळं होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं होत त्यांना तो चित्रपट आणि ती भूमिका मिळणं. या चित्रपटाबाबतची एक पडद्यामागची गोष्ट अलका कुबल यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितली आहेतर जाणून घेऊया. काय आहे किस्सा. त्या म्हणाल्या,विजय कोंडकेंना अलका यांना या चित्रपटासाठी घ्यायचच नव्हतं. कारण त्यांना अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांना या चित्रपटात घ्यायचं होत.
भाग्यश्री पटवर्धन यांच्या मागे विजय यांनी जवळ जवळ ६ महिने घालवले. पण त्या काही या चित्रपटासाठी तयार झाल्या नाहीत कारण त्यांना तेव्हा मराठी चित्रपट करायचा नव्हता. आणि या चित्रपटाच्या दिग्दर्शकांचं सुरवातीपासून असं मत होत की या चित्रपटासाठी अलका यांना घ्यावं.पंरतु विजय यांचं असं मत होत की अलका यांची आधीच एक इमेज तयार झाली आहे. कारण माहेरची साडी चित्रपटाच्या पूर्वी अलका ताईंनी ३० चित्रपट केले होते. म्हणून विजय यांना एखादा नवीन चेहरा किंवा हिंदी मध्ये काम केलेली अभिनेत्री हवी होती. परंतु ते सर्व काही जुळून आलं नाही. आणि, अलका ताईंनाच हा चित्रपट मिळाला.जे ज्याचं असत ते त्यालाच मिळत हे अगदीच खरं आहे. (Alka kubal Maherchi Saree)

हे देखील वाचा : ‘शरीरप्रदर्शन करायची माझी….’म्हणून अलका कुबल यांनी नाकारले हिंदी चित्रपट
म्हणून अलका कुबल म्हणतात माहेरची साडी आधी मी ३० चित्रपट जरी केले असतील तरी खरा माइल्डस्टोन माहेरची साडीच आहे.माहेरच्या साडीला जे यश त्या काळात मिळालं ते अद्भुत होत. पाच, सात रुपये तिकीट असताना या चित्रपटाने कोटींमध्ये कमाई केली होती.ज्यावेळी प्रमोशन ही इतकं नसायचं.या चित्रपटामुळे जवळ जवळ दहा पंधरा वर्ष त्या स्थानावरून त्या हलल्या नाहीत.ग्लॅमर, प्रसिद्दी काय असते ती त्यांनी पाहिली आणि त्या काळात त्यांनी २०० चित्रपट केले.त्यामुळे ज्या चित्रपटांनी त्यांना एवढं दिल तो नक्कीच त्यांच्यासाठी खास आणि महत्वाचा आहे.