शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर चर्चा खऱ्या ठरल्या! हार्दिक-नताशा एकमेकांपासून कायमचे वेगळे, लग्नाच्या अवघ्या चार वर्षांतच मोडला संसार

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 19, 2024 | 9:41 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Indian cricketers Hardik Pandya and her wife Natasha Stankovic announced their separation after four years of marriage know more

अखेर चर्चा खऱ्या ठरल्या! हार्दिक-नताशा एकमेकांपासून कायमचे वेगळे, लग्नाच्या अवघ्या चार वर्षांतच मोडला संसार

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांनी नुकतीच विभक्त होत असल्याची घोषणा केली. दोघांमधील घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होत्या आणि  अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. तसंच हार्दिक व नताशा यांच्या नात्याला पूर्णविरामदेखील लागला आहे. गेले अनेक दिवस हार्दिक व नताशा यांच्यात काही आलबेल नसल्याचे दिसून येत होते. दोघांच्या नात्यात दरी निर्माण झाली होती. त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियासह इतर सर्व प्रसार माध्यमांमध्ये अनेक चर्चा होत होत्या. मात्र या दोघांनी त्याबद्दल अधिकृतपणे भाष्य केलं नव्हतं. मात्र आता त्यांनी यावर स्पष्टपणे सांगितले आहे.

नताशाने सोशल मीडियावरुन त्यांच्या लग्नाचे फोटो हटवल्यापासूनच दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी आणखी जोर धरला होता. मात्र, याबाबत दोघांकडूनही अधिकृत घोषणा झाली नव्हती. अखेर हार्दिक व नताशाने काल (गुरुवार, १८ जुलै) संध्याकाळी एकमेकांपासून विभक्त होत असल्याची पोस्ट शेअर केली. आम्ही ४ वर्ष एकत्र राहिल्यानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला, असे हार्दिकने म्हटले आहे. हार्दिक व नताशा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे याबद्दल सांगितले

View this post on Instagram

A post shared by Hardik Himanshu Pandya (@hardikpandya93)

हार्दिकने त्याच्या या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले व आमचे सर्वस्व दिले आणि आम्हाला विश्वास आहे की, हे आम्हा दोघांच्याही हिताचे आहे. आम्ही एकत्र अनुभवत असलेला आनंद, परस्पर आदर आणि सहकार्य लक्षात घेऊन तसेच आम्ही एक कुटुंब म्हणून वाढत असताना हा निर्णय घेणे आमच्यासाठी कठीण होते. अगस्त्यमुळे आमच्या आयुष्यात भरभराट आली”.

आणखी वाचा – शुक्रवारी ‘या’ राशीच्या लोकांचे आयुष्य उजळणार, नोकरी व व्यवसायात आहेत लाभाच्या संधी, जाणून घ्या…

यापुढे त्याने असं म्हटलं की, “आम्ही त्याला जगातील सर्व सुख देण्याचा प्रयत्न करु. तो आमच्या जीवनाचा आधार असेल. आम्ही दोघे मिळून त्याची काळजी घेऊ. त्यामुळे या कठीण व संवेदनशील काळात आम्हाला गोपनीयता देण्यासाठी आम्ही तुमच्या समर्थनाची व आम्हाला समजून घेण्याची मनापासून विनंती करतो”.

आणखी वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याचा साधेपणा, जमिनीवर बसून वृद्ध महिलेला स्वयंपाकात मदत केली अन्…; चाहत्यांकडून कौतुक

दरम्यान, नताशा एका नाईट क्लबमध्ये हार्दिकला भेटली होती. यानंतर दोघांचे नाते काही वेळातच घट्ट झाले. दोघांनी ३१ मे २०२० रोजी त्यांच्या नात्याचा खुलासा केला. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकनं ३० जुलै २०२० रोजी अगस्त्य नावाच्या मुलाला जन्म दिला. नंतर १४ फेब्रुवारी २०२३ रोजी उदयपूर येथे हिंदू रितीरिवाजांनुसार त्यांचे लग्न झाले होते.

Tags: Hardik Pandya Natasha StankovicHardik Pandya Natasha Stankovic Separated Marathi NewsHardik Pandya Natasha Stankovic Separated News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Paaru Serial Update

गुरुजींकडूनही पारू व आदित्यला मिळाला आशीर्वाद, दोघांचं हे नातं नेमकं कोणतं वळण घेणार?, मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.