Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात सध्या धुमाकूळ सुरु असलेला पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’मधील एक वाद सध्या चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. जान्हवी किल्लेकरने पॅडी कांबळेचा अभिनय कारकिर्दीवरुन केलेला अपमान. जान्हवीने हा अपमान करताच अनेकांना खटकलं असून यावर अनेक कलाकार मंडळींनी आपलं मत मांडत सडेतोड भाष्य केलं आहे. अनेक कलाकार मंडळी, प्रेक्षक मंडळी जान्हवीच्या या वागण्यावर भाष्य करताना दिसत आहेत. अशातच पॅडी कांबळेची सिनेसृष्टीतील खास मैत्रीण विशाखा सुभेदार हिने ‘बिग बॉस’च्या घरात पॅडी गेल्यापासून त्याला पाठिंबा देताना दिसल्या.
आता आपल्या मित्राचा अपमान झाल्यानंतरही विशाखाने मित्राच्या बाजूने स्टॅन्ड घेत भाष्य केलं आहे. जान्हवीने अपमान केल्यानंतर तिने पॅडी कांबळेची माफी मागितली. मात्र ही माफी तिने मनोभावे न मागता खोटी असल्याचं म्हणत अनेकांनी दावा केला. यातच विशाखा यांनी जान्हवीने माफी मागल्यानंतर मित्राचं कौतुक करत खास पोस्ट शेअर केली आहे.

विशाखा यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत, “तुला माफ केलं असं तो म्हणाला नाही. पण मनाचा मोठेपणा मात्र दाखवला. ठीक आहे. म्हणजे ठीक आहे असं म्हणाला. अभिनेता आहे तो, आम्ही रोज हे भाव भावनांचं विश्व घेऊन हिंडतो. पाठमोरा माणूस सुद्धा काय म्हणत असेल हे कळुच शकत आम्हाला, कारण तोच तर आमचा धंदा आहे. त्या अनुभवी माणसाला अश्रू खरे खोटे कळले नसतील?, तरीही तुझ्या खोट्या अश्रूंना तो ठीक आहे म्हणाला. कारण तो खरच बाप माणूस आहे. त्याने दिला असेल विषय सोडून पण बाई आता तरी जिभेला आवर घाल. तुला खूप शक्ती मिळो पॅडी”. असं म्हटलं आहे.
शिवाय त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर करत, “काल काय झालं. बाहेरच्या जगात सुद्धा मी तुझं रक्षण करेन अशी रक्षाबंधन साजरी झाली. शॉपिंग झाली, माफी मागणं ही नौटंकी झाली, कॅप्टन बदलला आणि तेच जास्त माईकवरुन बोलले”, असं म्हटलं आहे. ही पोस्ट शेअर करत तिने लढ बापू #आपला पॅडी #संयमकायम #अभिनेता हे हॅशटॅगही वापरले आहेत.