Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीच काही ना काही अनपेक्षित घडताना दिसत असतं. अशातच यंदाच्या आठवड्यात एक अशी गोष्ट घडली ज्याने साऱ्यांना धक्का बसला. यंदाच्या या आठवड्याची कॅप्टन्सी अरबाज पटेल कडे होती. मात्र अरबाजला स्पर्धकांच्या चुकांमुळे ही कॅप्टन्सी गमवावी लागली. स्पर्धकांच्या चुकांमुळे ‘बिग बॉस’ सर्वांना शिक्षा देतात की, घरातील सर्व ग्रोसरी जप्त केली जाणार आहे, शिवाय बेड आणि दोन्ही बाथरुम वापरण्यास सक्त मनाई केली जाते. एकाही टीमने ‘सत्याचा पंचनामा’ या टास्कमध्ये बीबी करन्सी न जिंकल्याने त्यांना ही शिक्षा दिली जाते.
‘बिग बॉस’ यांनी अरबाज पटेलसमोर दोन पर्याय ठेवतात. एकतर दोन लाख रुपयाची करन्सी किंवा कॅप्टन पद. यापैकी कोणताही एक पर्याय स्वीकारावा आणि ते कॅप्टन पद इतर कोणत्याही स्पर्धकाला स्वाधीन करावे. अरबाजसमोर खूप मोठा प्रश्न होता जर कॅप्टनशी गेली तर आपली इम्युनिटी ही जाईल ही सुद्धा टांगती तलवार त्याच्यावर होती. अशावेळी अरबाजने कॅप्टनशी सोडण्याचा निर्णय घेतला आणि घरातल्यांचा विचार करुन त्यांना करन्सी घेतली. शिवाय हे कॅप्टन पद त्याने निक्की तांबोळीला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून दिले. आणि अशाप्रकारच्या निक्की घराची नवीन कॅप्टन ठरते आणि तिला इम्युनिटीही मिळते.
निक्की कॅप्टन झाल्यानंतर तिचं वागणं बदलला असल्याचा दावा आता तिच्याच टीम मधील लोकांनी केला असल्याचं समोर आलं आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, निक्कीच कॅप्टन झाल्यानंतरच वागणं अरबाज, जान्हवी यांना खटकलं आहे. अरबाज जान्हवी व घनःश्यामला म्हणाला, “ती थोडं वेगळं वागत आहे”. यावर जान्हवी म्हणते, “तुला पण असंच वाटलं का?, पावर आल्यासारखं”. यावर अरबाज म्हणाला, “ती खूप वेगळी वागत आहे. बदलल्यासारखी वागत आहे”. यावर जान्हवी म्हणते, “अरबाज आपलं निरीक्षण सारखंच आहे”. यावर घनःश्याम म्हणतो, “मला त्या विषयावर काहीच बोलायचं नाही”.
पुढे जान्हवी म्हणते, “मी पण गेला काही वेळ तेच बघत आहे. मला तेच जाणवलं”. त्यावर अरबाज म्हणतो, “असंच आयुष्य बाहेरही असतं. कधी कोणी बंगल्यात असतं, कधी रस्त्यावर. तुमच्या हातात काहीच नाही. ज्यांनी तुम्हाला हे दिलं त्यांनाच तुम्ही असं वागवत आहात. खाऊन पिऊन हात पुसून जातात काहीस तसं”. यावर जान्हवी अरबाजच्या मतात सहभागी होते”.