Bhagyashree Nhalve post for Late Mother : मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे हीच काही दिवसांपूर्वीच लग्नसोहळा पार पडला. पण तिच्या लग्नाचा आनंद फार काळ टिकला नाही. काहीच दिवसांत तिच्या आईचं निधन झालं. तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वीच भाग्यश्री न्हालवे हिच्या आईचं निधन झालं. दरम्यान तिने याबद्दलक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भाग्यश्रीने तिच्या आईसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करत तिने लिहिलं की, “महाराष्ट्रात नवीन लग्न झालेल्या मुली वर्ष भर नवीन नवरी असतात. पहिल्या वर्षातील सगळे सण हे तिचे असतात. नव्याचे नऊ महिने पण असं झालं नाही. माझ्या बाबतीत तसं काही घडणार त्या आधीच आई तुझ्या तेराव्याच असं सवाष्णी जेवण मला जेवाव लागलं आहे. प्रत्येक घासा गणिक तू माझ्या डोळ्यातील पाण्याबरोबर तरंगत होतीस. मनातल्या मनात मी तुला विचारत होते याच करता का मला तू सौभाग्यवती केलस? मला कोणतेही सण वार नको होते ग आई. मला तू हवी होतीस. अरेंज मॅरेजमध्ये मला तू हवी होतीस. खूप काही बोलायला, खूप काही समजुन घ्यायला, खूप काही समजून सांगायला. You are my therapist.” (Bhagyashree Nhalve post for Late Mother)
पुढे ती म्हणाली, “तुझ्याशी सगळ बोलून मला हलकं वाटायचं. पण आता कोणाशी बोलावंस वाटत नाही. तुला घेऊन खूप ठिकाणी फिरायचं होतं. घरात झोपाळा बसवायचा राहून गेला. तुला आणि एक नातवंड द्यायचं होत. तुझ्या अशा जाण्याने मला खूप एकट वाटत आहे. तुझ्या जाण्याने माझं सगळ काही up side down झालं आहे. मला तुझेच भास होतात. अंगावर कोणी डोंगर ठेवला आहे असं वाटतं. माझी आई गेली तेव्हा मी मलेशियात होते. माझ्या आणि तुझ्या शेवटच्या भेटीसाठी झालेली ताटातुट कधीच कोणाला समजणार नाही. तू जाता जाता पण तुझ्या या राणूला strong decision घ्यावा लागला की, माझ्या आईला खूप गार लागतं. जिवंतपणी खूप यातना तू भोगल्यास. तेव्हा तुझ्या शेवटच्या क्षणी मला तुला यातना नाही द्याव्याशा वाटल्या. आणि एका क्षणात सगळं मी निमूटपने स्वीकारलं. कोणी माझा विचारही केला नाही. मला तुला शेवटचं भेटता येणार नाही, हे ऐकल्यावर मी जमिनीवर कोसळून पडले. आईची शेवटची भेट चुकली याची खंत घेऊन मला पूर्ण आयुष्य जगावं लागणार आहे. या विचाराने मला अर्धमेल्या सारखं वाटत आहे. आता माहीत नाही पुढे काय होईल?” (Bhagyashree Nhalve post for Late Mother)




