मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“देवाच्या कृपेने वाचला…” गोविंदाला आल्या जीवे मारण्याच्या धमक्या, घरातील बंदुकीमुळे बचावला; मॅनेजरचा खुलासा

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 5, 2026 | 5:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Govinda Get Threats Call

गोविंदाला आल्या जीवे मारण्याच्या धमक्या

Govinda Get Threats Call : बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी कारण अत्यंत गंभीर आहे. गोविंदाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा दावा त्याच्या मॅनेजरने केला आहे. या प्रकरणामुळे गोविंदाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हा यांनी ‘एएनआय’सी संवाद साधताना सांगितलं की, अभिनेत्याला यापूर्वीही धमकीचे फोन येत होते. एका घटनेदरम्यान गोविंदावर हल्ला झाला होता, मात्र त्यावेळी त्याच्याकडे स्वतःचं बंदूक असल्यामुळे तो मोठ्या अनर्थातून बचावला, असं त्यांनी म्हटलं आहे. “देवाची कृपा म्हणून तो वाचला, नाहीतर काय झालं असतं हे सांगता येणार नाही,” असंही शशी सिन्हा म्हणाले.

या घटनेनंतर त्यांनी पहाटेच गोविंदाकडे धाव घेत एफआयआर दाखल केल्याचं सांगितलं आहे. त्या रात्री घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ पुराव्यासारखा आमच्याकडे असल्याचाही दावा त्यांनी केला. मात्र, हा हल्ला नेमका कोणत्या वेळी आणि कशाप्रकारे झाला?, याच त्यांनी स्पष्ट केलेल नाही. दरम्यान, या वक्तव्यांमुळे ऑक्टोबर २०२४ मधील एक जुनी घटना पुन्हा चर्चेत आली आहे. त्या वेळी गोविंदाला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार , तो विमानतळासाठी निघण्याच्या तयारीत असताना त्याची बंदूक साफ करताना अपघातानं गोळी सुटली होती. ही गोळी थेट त्याच्या पायाला लागल्याने तो जखमी झाला होता.

आणखी वाचा – “उदरनिर्वाह होईल एवढेही पैसे मिळत नाहीत”, मराठमोळ्या गायकाचा मिळणाऱ्या मानधनाबाबत खुलासा, म्हणाला, “आमचं शोषण…”

पोलिसांच्या माहितीनुसार, गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर कपाटात ठेवताना चुकून दाबला गेला आणि बंदूक फायर झाली. ही घटना सकाळी साधारण ४:४५ च्या सुमारास घडली होती, जेव्हा तो कोलकाताला जाणाऱ्या फ्लाइटसाठी निघणार होता. या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं होतं. या अपघातानंतर गोविंदानं स्वतःची प्रकृती स्थिर असल्याचं सांगत चाहत्यांना दिलासा दिला होता. क्रिटीकेअर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या पायातील गोळी यशस्वीपणे काढली असून त्यांनी वेळेवर उपचार केल्याबद्दल गोविंदानं आभार मानले होते. आता मॅनेजरच्या सध्याच्या दाव्यांमुळे गोविंदाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे, या संपूर्ण प्रकरणाकडे इंडस्ट्रीचं लक्ष लागलं आहे.

आणखी वाचा – नाव व ओळखीचा गैरवापर, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा संताप, थेट हायकोर्टाची धाव घेतली अन्…

Tags: bollywood newsentertainment newsGovinda Get Threats Call
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam collection

’क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’च्या यशाचा जल्लोष, २५ करोड रुपयांचा गल्ला जमविला, भाग २ ची घोषणा केली आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.