Madhavi Nimkar : कलाविश्वात अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांनी आजवर नकारात्मक भूमिका साकारत मनोरंजनविश्व गाजवलं आहे. खलनायकाच्या भूमिकांसाठी त्यांना विशेष ओळख मिळाली. मालिकाविश्वातील अशीच एक लोकप्रिय खलनायिका म्हणजे माधवी निमकर. आजवर माधवीने तिच्या खलनायिकांच्या भूमिकांनी रसिकांच्या मनात घर केलं. पण ही खलनायिकांची भूमिका साकारताना याचा त्या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यावर काही परिणाम होतो का?, असे अनेकदा वाटते. याबाबत आता माधवीने स्वतःच भाष्य केलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत माधवीने निगेटिव्हिटी घरी घेऊन जाताना होणारा त्रास आणि आयुष्यातील निगेटिव्ह लोकांशी ती कशी डील करते याबाबत तिने भाष्य केलं आहे.
‘मज्जा पिंक’च्या ‘Healing With Vanashree’ या कार्यक्रमात माधवीने हजेरी लावली. यावेळी बोलताना ती म्हणाली, “इतके निगेटिव्ह रोल्स तू केलेस ती निगेटिव्हिटी घरी घेऊन जाताना तुला त्याचा त्रास होतो का?, वा तुझ्या लाईफमधील निगेटिव्ह लोक आहेत, जशी तू निगेटिव्ह आहेस, त्याप्रमाणे तुझ्या आयुष्यातील जे निगेटिव्ह लोक आहेत त्यांच्याशी तू कशी डील करते हे आम्हाला ऐकायला आवडेल?”, असा प्रश्न माधवीला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ती म्हणाली, “शेवटचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मोठं द्यावं लागणार आहे. निगेटिव्ह माणसं तर आपल्या आजूबाजूला असतात. आणि त्याविषयी आपण बोलूच.पहिली गोष्ट म्हणजे जसं तू मला विचारलंस की, तू निगेटिव्ह रोल करत असताना घरात ती निगेटिव्हिटी घरामध्ये येऊ शकते का?, तर पहिली गोष्ट नाही”.
आणखी वाचा – पंकज धीर यांच्या पश्चात आहे हसतं-खेळतं कुटुंब, पत्नीच नाहीतर सून आणि मुलगाही सिनेविश्वात कार्यरत
पुढे ती म्हणाली, “मी तेवढी कॅपेबल आहे किंवा माझ्यात प्लसपॉईंट आहे असं समज की, मला स्विच ऑन आणि स्विच ऑफ खूप चांगल्या पद्धतीने करता येतं. ती सेटवर जी असते, ती सेटवर असताना पॅकअपपर्यंत मी त्या भूमिकेत असते म्हणजे कट होईपर्यंत खरंतर. त्यानंतर माधवीच असते मी. पण घरी जाताना ज्यावेळेला मी माझ्या गाडीमध्ये बसते आणि माझ्या घरापाशी येते ते येण्यापूर्वीच मी ती भूमिका सेटवर सोडलेली असते. किव्हा ती निगेटिव्हिटी, त्या भूमिकेतील निगेटिव्हिटी मी सेटवर सोडलेली असते. निगेटिव्हिटी मी कॅरी करुच शकत नाही, हा आता मला दैवी देणगी असेल माहित नाही. मला जेव्हा कळतं की, निगेटिव्हिटी thoughts माझ्याजवळ येत आहेत तर ते मला रिमूव्ह कसे करायचे हे ही मला माहित असायचं, कारण मुळातच मला आनंदी राहायला आवडतं. सो माझा फोकस मला काय छान वाटतंय, मला काय छान वाटतंय असं काहीतरी करायचंय. सो ते ऑटोमॅटिकली निगेटिव्हिटी फार काळ माझ्यावर टिकतंच नाही. घरी गेल्यानंतर तर पॉसिबलच नाही गं. घरी गेल्यानंतर आपली मुलं, माझा मुलगा त्याचा चेहरा बघितल्यावर कसली निगटीव्हीटी राहणार आहे मला सांग. कारण की ती फॅमिलीच एक पॉसिटीव्हिटी, ती ऊर्जा कुठल्याच निगेटिव्हिटीला आजूबाजूला थांबू देत नाही”.
आणखी वाचा – “मोठा आशीर्वाद…”, बाबा होण्यासाठी विकी कौशल उत्सुक, पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाला, “मी घर सोडणार…”
“आज मला आवर्जून सांगायला आवडतंय की, उषा या मोठ्या सिनियर आर्टिस्ट आहेत, जेव्हा मी स्वप्नांच्या पलीकडील ही सिरीयल केली होती तेव्हा त्या माझ्याकडे राहायला आल्या होत्या. की त्यांना उशीर झाला होता आणि मी त्यांना म्हटलं होतं की, उषा ताई तुम्ही आमच्याकडेच राहा आणि त्या एकदिवस आमच्याकडे राहिल्याही होत्या. त्यावेळी त्यांनी जे सांगितलं त्याच्यातंन मला कळलं की, हो यार माझ्यात असा बदल घरी आल्यानंतर होतो. आणि दुसऱ्या दिवशी त्या सगळ्यांना सेटवर सांगत होत्या माधवी जी आता दिसतेय ना तर उंबरठ्याच्या आत गेल्यावर ती पूर्णतः वेगळी आहे. ती गृहिणी आहे”.





