बॉलिवूड अभिनेत्री रेणुका शहाणे या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ‘हम आपके है कौन’ या चित्रपटातून त्या अधिक नावारूपास आली. आजवर त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या त्या काही वेबसीरिजमध्ये काम करताना दिसत आहेत. सध्या त्या सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. नुकतेच त्यांनी मासिक पाळी संदर्भात भाष्य केले आहे. तसेच मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी उघडपणे भाष्य केले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी स्वतःचे अनुभव शेअर केले आहेत. (renuka shahane on periods)
नुकताच त्यांनी एका ‘वी आर युवा’ या पॉडकास्टवर मासिक पाळी व समाज यांच्याबद्दल भाष्य केले आहे. यावेळी रेणुका यांनी सांगितले की, “मी आज ५८ वर्षाची आहे आणि मी माझं अधिक आयुष्य हे मासिक पाळीमध्ये घालवलं आहे. पाळी लवकर आल्यामुळे मला माझं खूप कमी बालपण मिळालं. मात्र शरीरात नक्की काय बदल होत आहेत हे समजणं कठीण होतं”.
पुढे त्या म्हणाल्या की, “मी खूप भाग्यवान आहे की माझ्या या वेळी माझी आई माझ्याबरोबर होती. माझ्या आईने मला समजावण्यासाठी तिने एक प्रतिकृती बनवली आणि सांगितली की हे नक्की कसं कार्य करतं. माझ्या घरीदेखील या सगळ्यावर उघडपणे चर्चा होत असे. पण माझ्या शरीरात नक्की कोणते बदल होत आहेत तसेच यामागील कारण काय? हे समजत नव्हते. पण आजूबाजला असलेल्या लोकांनी हे खराब नसल्याचे नेहमी सांगितलं”.
त्याचप्रमाणे या मुलाखतीमध्ये शाळेमध्ये आलेल्या एकटेपणाबद्दलही भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, “शाळेत मी माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर मासिक पाळीविषयी बोलू शकत नव्हते. माझ्या वर्गांमधील मुलींना पुढील तीन वर्ष मासिक पाळी आली नाही. त्यामुळे या गोष्टी शेअर करण्यासाठी मुलींच्या मासिक पाळी येण्याची वाट बघावी लागत असे”. दरम्यान त्यांनी या मुलाखतीवेळी मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे याबद्दल आता उघडपणे चर्चा होणेही गरजेचे आहे.