‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांना अगदी खळखळून हसवले. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे जगभरात लाखो चाहते दिवाने आहेत. या कार्यक्रमातील कलाकारांचे त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षक नेहमीच कौतुक करत असतात. या कार्यक्रमातील एक प्रेक्षकांचा लाडका अभिनेता म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसादने त्याच्या विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच राज्य केले आहे. या कार्यक्रमाशिवाय प्रसाद दिग्दर्शन क्षेत्रातही सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. (Prasad Khandekar Post)
काही दिवसांपूर्वीच प्रसादचा ‘एकदा येऊन तर पाहा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. अशातच काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम सिंगापूर दौरा करण्यात व्यस्त होती. या सिंगापूर दौऱ्यानिमित्त कलाकारांनी त्यांच्या कुटुंबीयांनाही परदेश दौऱ्याची सफर घडवून आणली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील बरेच कलाकार त्यांच्या कुटुंबीयांसह हा सिंगापूर दौरा करण्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले.
हास्यजत्रेतील टीमचे कुटुंबीयांबरोबरचे सिंगापूर दौऱ्यादरम्यानचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाले होते. यावेळी प्रसाददेखील त्याच्या बायको व मुलासह सिंगापूर दौरा करण्यात व्यस्त होता. या सिंगापूर दौऱ्याचे अनेक फोटो प्रसादने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटबावरुन शेअर केले आहेत.अशातच प्रसादने या सिंगापूर दौऱ्यानिमित्तची एक आठवण शेअर करत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक पोस्ट शेअर करत प्रसादने म्हटलं आहे की, “अल्पा व श्लोकबरोबर पहिली फॅमिली इंटरनॅशनल टूर, सिंगापूर टूर. आतापर्यंत खूप दौरे केले हिंदी नाटकाच्या व इव्हेन्टच्या निमित्ताने खूप इंटरनॅशनल टूर केल्या.”
पुढे त्याने लिहिलं आहे की, “पण गेल्या वर्षी ‘कुर्रर्रर्रर्र’च्या निमित्ताने जेव्हा अमेरिकावारीला गेलो तेव्हा युनिव्हर्सल स्टुडिओला आम्ही गेलो होतो. तेव्हा प्रकर्षाने घरच्यांची आठवण आली आणि श्लोकला, अल्पाला कधी इंटरनॅशनल टूरवर नेता येईल याची संधी शोधत होतो. पण तुम्ही जर मनापासून इच्छा व्यक्त केली तर ती पूर्ण होते आणि युनिव्हर्सल स्टुडिओला कुटुंबाला नेण्याची इच्छा युनिव्हर्सने पूर्ण केली”, असं म्हणत त्याने सिंगापूर फिरतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत.