शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर शस्त्रक्रिया, मेंदूमध्ये रक्ताची गाठ असल्याचे निदान, आता अशी परिस्थिती की…

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 30, 2024 | 3:30 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
gal gadot surgery

आठव्या महिन्यांची गरोदर असताना गॅल गॅडोटवर शस्त्रक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा ‘हार्ट ऑफ स्टोन’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला. या चित्रपटात अजून एक अभिनेत्री दिसून आली होती. ही अभिनेत्री म्हणजे गॅल गॅडोट. या अभिनेत्रीने साकारलेले डीसी सुपरहीरो वंडर वुमनची भूमिकादेखील अधिक चर्चेत राहिली. या अभिनेत्रीने आता एका चिमुकलीला जन्म दिला आहे. मुलीचे नाव ओरी असे ठेवले आहे. मात्र या मुलीच्या जन्मानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगितले आहे. याबद्दलची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. मेंदूमध्ये रक्ताची गाठ तयार झाली होती. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती तिने दिली आहे. (gal gadot surgery)

गॅलने याबद्दल सांगितले की, “हे वर्ष खूप आव्हानांचे राहिले आहे. मी कसं काय सगळं शेअर करु? याबद्दल मला नेहमी प्रश्न उपलब्ध राहतो. आता मी माझ्या सगळं स्वीकारण्याचा व शेअर करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सगळं शेअर करुन मी जागरुकता करेन असे वाटत आहे. फेब्रुवारी मी आठ महिन्यांची गरोदर होते. त्यावेळी मला माझ्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ असल्याचे समजले. अनेक महिन्यांपासून खूप डोकं दुखत होतं. यामुळे मी सतत झोपून असायचे.  मी एमआरआय केला त्यावेळी मोठं सत्य समजलं. त्यावेळी आपलं आयुष्य किती नाजूक आहे? हे समजलं. मी जीवंत राहावी असंच मला वाटायचं”.

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लगीनघाई!, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, पारंपरिक लूकमध्ये नटली नवरी

pic.twitter.com/rg2Ix5x0TC

— Gal Gadot (@GalGadot) December 29, 2024

पुढे ती म्हणाली, “आम्ही रुग्णालयात पोहोचलो आणि काही तासांतच माझ्यावर शस्त्रक्रिया झाली. माझी मुलगी ओरीचा जेव्हा जन्म झाला तेव्हा आम्ही खूप घाबरलो होतो. आता मी ठीक झाले आहे आणि मला माझं आयुष्य परत मिळालं आहे. मी माझ्या या सगळ्या प्रवासामुळे खूप काही शिकले आहे. सर्वात आधी तुमचं शरीर काय म्हणत आहे ते ऐका आणि त्यावर विश्वास ठेवा”.

आणखी वाचा – “प्राजक्ताची पत्रकार परिषद राजकीय हेतु”, सुषमा अंधारेंचा प्राजक्ता माळीवर राग, म्हणाल्या, “करुणा यांच्यावर का नाही बोलली? आणि…”

मिळालेल्या माहितीनुसार, सेरेब्रल वेन्स थ्रोम्बोसिस आजाराचे निदान झाले. यामध्ये मेंदूमध्ये रक्ताची गांठ होण्याची शक्यता असते. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, ३० किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्या लाख महिलांमधील ३ जणींना या रोगाचे निदान होते. गॅलने रियल इस्टेट डेव्हलपर यारोन वर्सनबरोबर लग्न केले. तिला चार मुली आहेत.  

Tags: gal gadothollywood actresssurgery
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Actress Megha Dhade shared a special video supporting Prajakta Mali and said that all this is very objectionable.

"पुराव्याशिवाय नाव घेऊ नका आणि...", प्राजक्ता माळीच्या बदनामीवर मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, "उगीच टीका करत..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.