शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कॅन्सरपासून वाचण्यासाठी ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केली स्तनांची शस्त्रक्रिया, म्हणाली, “स्तन काढल्याने मातृत्वावर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 4, 2024 | 1:29 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
angelina jolie breast cancer

कॅन्सरपासून वाचण्यासाठी 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केली स्तनांची शस्त्रक्रिया, म्हणाली, "स्तन काढल्याने मातृत्वावर…"

टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान ही खूप लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक मालिका,चित्रपट व वेबसीरिजममध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मात्र तिच्या तब्येतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली. हिनाला स्तनांचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते आणि त्यानंतर मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ उडाली. रोगाचे निदान झाल्यानंतर ती पहिल्या केमोथेरपीसाठी रुग्णालयात पोहोचल्याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. हिनानेदेखील या आजाराला झुंज देणार आणि जिंकणार असा आत्मविश्वास दर्शवला आहे. मात्र स्तनाच्या कर्करोगामुळे मनोरंजन क्षेत्रातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने शस्त्रक्रिया करुन स्तन काढले होते. (angelina jolie breast cancer)

हॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री अँजेलीना जोलीला स्तनांचा कर्करोग होऊ शकतो अशी शक्यता होती. पुढे काही जास्त होऊ नये म्हणून तिने आपले स्तनच काढून टाकले. ११ वर्षांपूर्वी अँजेलीनाला कर्करोग होऊ शकतो या भीतीने तिने डबल मास्टेक्टॉमी शस्त्रक्रिया केली होती. जनुकीय समस्यांमुळे स्तनांचा किंवा गर्भ पिशवीचा कर्करोग होऊ शकतो असे तिच्या डॉक्टरांनी सांगितले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिला ८७ टक्के स्तनांचा कर्करोग व ५४ टक्के गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली होती.

आणखी वाचा – ‘त्या’ सीनसाठी गावकऱ्यांनी मदत केली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “शूटिंगमधील…”

View this post on Instagram

A post shared by Angelina Jolie (@angelinajolie)

न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालात अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला होता. अँजेलीनाने त्यात लिहिले होते की, “जेव्हा मला सत्य समजले तेव्हा मी सतर्क झाले होते. त्यामुळे मी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. मी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. याची सुरुवात मी स्तनापासून केली कारण गर्भाशयाच्या कर्करोगापेक्षा स्तनाचा कर्करोग होण्याची अधिक शक्यता होती”.   

आणखी वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम लोकप्रिय अभिनेत्रीची हिंदी वेबसीरिजमध्ये वर्णी, हृता दुर्गुळेबरोबर ‘या’ सीरिजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पुढे ती म्हणाली की, “स्तन काढल्यानंतर कर्करोग होण्याची शक्यता केवळ ५ टक्केच राहिली. मी माझ्या मुलांना सांगते की कर्करोगामुळे आईला गामावणार नाहीत. ते माझ्या केवळ लहान जखमाच बघू शकतात बाकी काही नाही”.

त्यानंतर ती म्हणाली की, “मला खात्री आहे की माझ्या अनुभवामुळे इतर महिलांना खूप फायदा होईल. स्तन काढल्याने माझ्या मातृत्वावर कोणताही परिणाम झाला नाही. मेसेक्टॉमी शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांना त्यांचे सौंदर्य परत मिळवता येईल. पण ज्या माहिला आजारी नाहीत त्यांना फायदा होणार नाही”. अँजेलीनाच्या या उचलल्या गेलेल्या पावलामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र यामुळे अनेक महिलांना प्रेरणा मिळाली.

Tags: angelina joliebreast cancerremove breast
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Bollywood Actress Hina Khan cut her hair due to cancer and she shared a heart touching video

Video : कॅन्सरमुळे हिना खानला कापावे लागले केस, लेकीची अवस्था पाहून आईला अश्रु अनावर, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.