सध्या सर्वत्र लॉस एंजेलिस येथे लागलेल्या आगीची चर्चा सुरु आहे. गुरुवारी सकाळी लागलेल्या या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वित्त हानी झालेली बघायला मिळाली. लॉस एंजेलिस येथे इतिहासातील सगळ्यात मोठी आग लागलेली बघायला मिळाली. या आगीमध्ये संपूर्ण शहर जळून खाक झाले आहे. यामध्ये अमेरिकन चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनादेखील या आगीचा फटका बसला आहे. आग लागल्यानंतर वारे वेगात म्हणजे तब्बल ९० किलोमीटर प्रती वेगाने वाहत असल्याने ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. यामध्ये आता अनेक हॉलिवूडकरांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. यामध्ये अनेक कलाकारांचे घर उद्ध्वस्त झाले असून त्यांनी याबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. (actors on hollywood fire)
लॉस एंजलिस येथे लागलेल्या आगीमध्ये अनेकांवर संकट कोसळलं. यामध्ये अनेक कलाकार तसेच दिग्गज कलाकार यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीमुळे काही अलिशान रियल इस्टेट व काही प्रसिद्ध लँडमार्क जळून खाक झाले आहेत. मिडीया रिपोट्सनुसार, पॅरिस हिल्टन,बिली क्रिस्टल व अडम ब्रॉडी या दिग्गजांनी या भयंकर आगीत आपली घरं गमावली आहेत.
‘निक्सन’ व ‘कॅसिनो’ अशा चित्रपटांमध्ये अभिनय करणारा अभिनेता जेम्स वुड्सने ‘सीएनएन’बरोबर बोलताना पॅसिफिक पॅलिसेड्स प्रॉपर्टीबद्दल सांगितले. ते म्हणाले की, “एक दिवस तुम्ही स्विमिंग पूलमध्ये असता तर दुसऱ्या दिवशी सगळं काही संपलेलं असतं”. तसेच पॅरिस यांच्या मालिबू या घराचे नुकसान झाले आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, “कुटुंबासहित बसून बातम्या बघताना लाईव्ह टीव्हीवर मालीबू येथील घर जळताना बघितले. हा प्रसंग कधीही कोणावरही येऊ नये”.
पुढे त्यांनी लिहिले की, “हे तेच घर आहे जिथे आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. या घटणेमध्ये नुकसान झालेल्या कुटुंबासमवेत माझ्या संवेदना नेहमी आहेत”. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, लॉस एंजलिस येथे अजूनही आग भडकली आहे. आतापर्यंत १,३७,००० पेक्षा अधिक लोक घर सोडून निघून गेले आहेत. कमीत कमी पाच लोकांचा मृत्यू झाला आहे.