रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लॉस एंजलिसच्या भयावह आगीत ‘या’ हॉलिवूड कलाकारांची घरं जाळून खाक, मोठं नुकसान, व्यक्त केल्या भावना

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 10, 2025 | 12:58 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
actors on hollywood fire

हॉलिवूड कलाकारांची घरं झाली खाक

सध्या सर्वत्र लॉस एंजेलिस येथे लागलेल्या आगीची चर्चा सुरु आहे. गुरुवारी सकाळी लागलेल्या या आगीमध्ये  मोठ्या प्रमाणात वित्त हानी झालेली बघायला मिळाली. लॉस एंजेलिस येथे इतिहासातील सगळ्यात मोठी आग लागलेली बघायला मिळाली. या आगीमध्ये संपूर्ण शहर जळून खाक झाले आहे. यामध्ये अमेरिकन चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनादेखील या आगीचा फटका बसला आहे. आग लागल्यानंतर वारे वेगात म्हणजे तब्बल ९० किलोमीटर प्रती वेगाने वाहत असल्याने ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. यामध्ये आता अनेक हॉलिवूडकरांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. यामध्ये अनेक कलाकारांचे घर उद्ध्वस्त झाले असून त्यांनी याबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. (actors on hollywood fire)

लॉस एंजलिस येथे लागलेल्या आगीमध्ये अनेकांवर संकट कोसळलं. यामध्ये अनेक कलाकार तसेच दिग्गज कलाकार यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीमुळे काही अलिशान रियल इस्टेट व काही प्रसिद्ध लँडमार्क जळून खाक झाले आहेत. मिडीया रिपोट्सनुसार, पॅरिस हिल्टन,बिली क्रिस्टल व अडम ब्रॉडी या दिग्गजांनी या भयंकर आगीत आपली घरं गमावली आहेत.

आणखी वाचा – “आशा आहे मी इथून बाहेर पडेन”, जीव वाचवण्यासाठी नोरा फतेहीला सोडावं लागलं लॉस एंजेलिस, म्हणाली, “भयानक परिस्थिती…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

‘निक्सन’ व ‘कॅसिनो’ अशा चित्रपटांमध्ये अभिनय करणारा अभिनेता जेम्स वुड्सने ‘सीएनएन’बरोबर बोलताना पॅसिफिक पॅलिसेड्स प्रॉपर्टीबद्दल   सांगितले. ते म्हणाले की, “एक दिवस तुम्ही स्विमिंग पूलमध्ये असता तर दुसऱ्या दिवशी सगळं काही संपलेलं असतं”. तसेच पॅरिस यांच्या मालिबू या घराचे नुकसान झाले आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, “कुटुंबासहित बसून बातम्या बघताना लाईव्ह टीव्हीवर मालीबू येथील घर जळताना बघितले. हा प्रसंग कधीही कोणावरही येऊ नये”.

आणखी वाचा – Singer P. Jayachandran Passes Away : राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक पी. जयचंद्रन यांचे निधन, वयाच्या ८०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुढे त्यांनी लिहिले की, “हे तेच घर आहे जिथे आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. या घटणेमध्ये नुकसान झालेल्या कुटुंबासमवेत माझ्या संवेदना नेहमी आहेत”. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, लॉस एंजलिस येथे अजूनही आग भडकली आहे. आतापर्यंत १,३७,००० पेक्षा अधिक लोक घर सोडून निघून गेले आहेत. कमीत कमी पाच लोकांचा मृत्यू झाला आहे.       

Tags: adam brodybili crystalparis hilton
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame Gurucharan Singh stopped eating and drinking for the last 19 days.

'तारक मेहता…' फेम सोढीची प्रकृती गंभीर, रुग्णालयामध्ये सुरु आहेत उपचार, १९ दिवसांपासून अन्न-पाणीही पोटात नाही अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.