Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गुरुवारी कॅप्टन्सीचा टास्क पार पडला. बसमधील सीटवर बसण्याचा हा टास्क असतो. खेळातील १२ स्पर्धकांनी ‘बिग बॉस’ने ठेवलेल्या ११ सीटवर धावत जाऊन बसायचे आणि जो १ स्पर्धक शिल्लक राहील तो कॅप्टनपदाच्या स्पर्धेतून बाद होईल. तो बाद झालेला स्पर्धक पुढील फेरीत तिकिट चेकर होणार आणि या तिकिट चेकरकडे अधिकार असणार की, जो दुसऱ्या फेरीत बाद होईल त्याला तो सदस्यांची अदलाबदल करू शकतो. पहिल्या फेरीत वर्षा उसगांवकर पाय दुखल्याचा अभिनय करतात, कारण त्यांचा पहिल्या फेरीत बाद होण्याचा प्लॅन असतो, मात्र त्यांचा हा प्लॅन फसतो. तर निक्की मुद्दाम सीटवर बसत नाही आणि स्वत:हून बाद होते. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
दुसऱ्या फेरीत अभिजीत सीटवर बसण्यासाठी पोहोचू शकत नाही. त्यामुळे निक्की त्याला बाद करते आणि यावरुन त्यांच्यात वाद होतात. यानंतर तिसऱ्या फेरीत घन:श्याम बाद होतो, पण तिकिट चेकर अभिजीत त्याला रिप्लेस करुन अरबाजला बाद करतो. चौथ्या फेरीत दोन स्पर्धक बाद होतील असे बिग बॉस जाहीर करतात. त्यावेळी वर्षा आणि जान्हवी बाद होतात. अरबाज तिकिट चेकर असल्याने वर्षा-जान्हवीला सीटवर बसवून तो पॅडी व घन:श्यामला बाहेर काढतो. त्यानंतर बहुमताने घन:श्याम तिकिट चेकर होतो. त्यानंतर पाचव्या फेरीत अंकिता व सूरज असे दोन स्पर्धक बाद होतात. तेव्हा घन:श्याम त्या दोघांनाही सुरक्षित करुन धनंजय-आर्याला बाद करतो.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi चा चौथा कॅप्टन बनला गोलीगत सूरज चव्हाण, सलग तीन आठवडे नॉमिनेटेड असूनही मिळवले कॅप्टन पद
यावरून डीपी घन:श्यामवर नाराज होतात. कारण आधी झालेल्या चर्चेत डीपी घन:श्यामला असं म्हणालेले असतात की, “माझा विचार आहे का डोक्यात?, कारण गेल्या आठवड्यात तुझ्या डोक्यात जशी इच्छा होती, तशी आता माझी ही आहे आणि गेल्या आठडव्यात आपण दोघे नॉमिनेशनमध्ये आहोत. तुला वाटलं तर तू आता माझा विचार करु शकतो’. यावर घन:श्याम त्यांना असं म्हणतो की, “थोडा विचार करु शकतो, जास्त नाही. तीन किंवा चार स्पर्धक आले तर नाही”. यावर डीपी पुन्हा त्याला असं म्हणतात की, “या आठवड्यात कॅप्टन्सी किती महत्त्वाची आहे हे तुला माहीत आहे”.
कॅप्टन्सी कार्यात दिलेला शब्द न पाळल्याबद्दल डीपी घन:श्यामळा विचारतात. तेव्हा घन:श्याम डीपीला म्हणतो की, त्याने त्याला कोणताही शब्द दिला नव्हता, त्याने फक्त प्रयत्न करेन असे म्हटले होते. यामुळे दोघांमध्ये काही काळ बाचाबाची होते. मात्र नंतर डीपी माघार घेतात. अशातच टास्कदरम्यान, डीपी वैभवला ग्रुपमध्ये मी माझ्याबद्दल काहीही बोललो नाही” असंही म्हटलेले असतात. त्यामुळे डीपी यांना त्यांच्याच ग्रुपमध्ये एकटे पडले असल्याचे जाणवत आहे आणि ही गोष्ट ते अंकिताकडे व्यक्त करतात.