रंगभूमी, रुपेरी पडदा व ओटीटी या सर्वच माध्यमांमधून सर्वदूर पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. अभिनयाबरोबरच नृत्यांगणा व विनोदी अभिनेत्री म्हणून तिला ओळखली जाते. ज्यात तिने दाखवलेल्या विविध कलागुणांचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले. तसेच, ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तिच्या या द्वारे विविध फोटोज, रील्स शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. तसेच, तिच्या विविध मुद्द्यांवरील पोस्टचीही बऱ्याचदा चर्चा होते. देशभरातील प्रमुख सण दिवाळीला नुकतीच सुरुवात झाली असून सध्या सर्वत्र दिवाळीचा माहोल पाहायला मिळतो. (hemangi kavi share a photo on diwali)
सर्वसामान्यांबरोबरच कलाकार मंडळींमध्ये देखील दिवाळीचा उत्साह पहायला मिळत आहे. अनेक कलाकार मंडळी आपल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांबरोबर दिवाळीचा आनंद साजरा करताना दिसत आहेत. अशात हेमांगीने दिवाळीनिमित्त सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
शेअर केलेल्या या फोटोमध्ये हेमांगी एका आकाश कंदीलच्या दुकानाबाहेर उभी असून तिच्या हातात छोटे-मोठे आकाश कंदील दिसत आहे. हा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली. ज्यात ती म्हणते, “दरवर्षीप्रमाणे यंदाही! मला आठवतंय, जेव्हापासून मला बाजारात जाऊन ‘आकाश कंदील’ निवडण्याची जबाबदारी कळायला लागली. तेव्हापासून ती देण्यात आली किंवा मी ती स्वतः घेतली. कारण रंगांचं ज्ञान इतरांपेक्षा टीचभर जरा बरं म्हणून, मग तेव्हापासून ही रीतच झाली. दरवर्षी वेळात वेळ काढून मी कंदील खरेदी करायला जाते म्हणजे जातेच. खूप भारी वाटतं निरनिरळ्या पद्धतीचे कंदील पाहून!”
हे देखील वाचा – Video : आरती केली, नजर काढली अन्…; सासरी थाटामाटात पार पडलं अमृता देशमुखचं केळवण, घराचीही दिसली झलक
“प्रत्येकाला वाटतं सर्वांपेक्षा वेगळा आणि हटके कंदील आपल्या दारात, खिडकीत आसावा! खरंतर कंदील इकडून-तिकडून सारखेच पण आपण निवडलेला कंदील हा आपल्या पुरता का होईना विशेषच असतो! पण मग इतक्या सर्व पर्यायांमधून तो ‘एक’ कंदील निवडणं काय सोप्पं काम नसतं गड्या! लय कठीण! म्हणजे मी एखादी साडी पटकन निवडेन पण कंदील निवडणं हे पूर्णपणे वेगळं आहे भाई. कारण ही गोष्ट अशी आहे, की ती घरातल्या प्रत्येकाला आवडायला हवी. आपली मनमानी करून चालत नाही! मला वाटलं म्हणून मी आणला असं करून नाही चालत. तर घरातल्या प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा विचार करून आणावा लागतो! निदान मी तरी असं करते! मज्जा असते सगळी!” असं म्हणत “तुम्ही करता का असं?” असा प्रश्न चाहत्यांना केला आहे.
हे देखील वाचा – नाटकाचा प्रयोग, मिसकॅरेज झालं अन्…; मराठी अभिनेत्री सुरभी भावेने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाली, “गर्भ काढून टाकलं आणि…”
हेमांगीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत तिला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तिचा हा लुक नेटकऱ्यांना आवडत आहे. एरव्ही मोजक्याच पण लक्षवेधी भूमिका करणारी हेमांगी तिच्या बिनधास्त स्वभावाची ओळखली जाते. तसेच, ती स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखली जात असून तिच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टची नेहमीच चर्चा होते. अभिनेत्रीचं ‘जन्मवारी’ नाटक सध्या रंगभूमीवर गाजत आहे.