सध्या कलाकार परदेश दौरा करण्यात व्यस्त आहेत. व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून ही कलाकार मंडळी आपल्या प्रियजनांसोबत किंवा कुटुंबासोबत फिरायला जात असतात. अशातच अभिनेत्री सई ताम्हणकर देखील परदेश दौरा करण्यात व्यस्त आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सई परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळाली, आता मात्र महाराष्ट्राची हास्यजत्रा या कर्यक्रमाने दोन महिन्यांसाठी ब्रेक घेतला असल्याने सई परदेश दौऱ्यावर गेली आहे. सुट्ट्यांसाठी सई थेट स्पेनला पोहचली आहे.(Saie Tamhankar Spain trip)
सई सध्या स्पेनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय, मात्र तिथे ती एकटी गेली नाही तर तिचा बॉयफ्रेंड अनिश जोगसोबत गेली आहे. त्या दोघांनी एकत्र अद्याप फोटो टाकले नसले तरी त्यांच्या स्टोरीवरील फोटोंनी त्यांची पोलखोल केली आहे.
पाहा कोणत्या फोटोंवरून सईचं सत्य आलं समोर (Saie Tamhankar Spain trip)
सई ताम्हणकर अनिश जोग सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनीही एकमेकांसोबत रिलेशनशिप मध्ये असल्याचं सांगितलं. त्यानंतर आता ते दोघे स्पेन ट्रिप एन्जॉय करत आहेत. सई आणि अनिशने स्पेनमध्ये फिरतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. दरम्यान सईने एकटीने फिरतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. दरम्यान दोघांच्या इंस्टाग्राम स्टोरीवरील सारख्याच पोस्ट केलेल्या फोटोने ते दोघे एकत्र स्पेन ट्रिपचा एन्जॉय घेत असल्याचं समोर आलं आहे.(Saie Tamhankar Spain trip)
हे देखील वाचा – नाशिक इव्हेंटच्या पडद्यामागची धमाल, हास्यजत्रेचा bts व्हिडीओ व्हायरल
सई ही स्पेन ट्रिप करण्यात व्यस्त आहे. सई स्पेनमध्ये जाऊन एन्जॉय करतानाचे फोटो तिने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. सई सोबत अनिश देखील फिरायला गेला असल्याचा अंदाज त्यांनी शेअर केलेल्या स्टोरीवरून लावण्यात येतोय. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा त्यांच्या लग्नाकडे लागून राहिल्या आहेत. सई आणि अनिशला एकत्र पाहून नक्कीच रंजक ठरेल.
