संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी : द डायमंड बाजार’ या वेबसीरिजला भरभरुन प्रतिसाद दिला. या आठ भागांच्या वेबसीरिजचे जगभरात सर्वांनी कौतुक केले. भन्साळी आपल्या कामाबाबत किती गंभीर आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे. आणि त्यांनी तयार केलेल्या प्रत्येक प्रतिकृतीतूनही पाहायलाही मिळते. तसेच, संजय लीला भन्साळीच्या चित्रपटांचे शूटिंग करताना, तो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे अगदी बारकाईने लक्ष देतो आणि तपशीलांकडे पूर्ण लक्ष देतो. त्यामुळेच त्यांची सर्जनशीलता प्रत्येक चित्रपटात स्पष्टपणे दिसून येते. (Heeramandi Actress Jayati Bhatia)
भन्साळींनी ‘हिरामंडी’ या वेबसीरिजसाठी अनेक दिग्गज अभिनेत्रींना कास्ट केले. आणि प्रत्येक अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने चाहत्यांना प्रभावितही केले. यादरम्यान अभिनेत्री शर्मीन सहगलला तिच्या अभिनयामुळे खूप ट्रोल व्हावे लागले. या अभिनेत्रींशिवाय वेबसीरिजमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी छोट्या भूमिका केल्या असल्या तरी त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांना खूप टाळ्या मिळाल्या आहेत. या यादीत जयती भाटिया या अभिनेत्रीच्या नावाचाही समावेश आहे. ‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्री जयती भाटियाने ‘हिरामंडी’मध्ये फत्तोची भूमिका साकारली आहे. अलीकडेच जयती यांनी ‘हिरामंडी’च्या संजय लीला भन्साळी यांच्या कार्यशैलीबद्दल आणि त्यांच्या स्वभावाविषयी सांगितले. त्यांनी खुलासा केला की, “या वेबसीरिजच्या सेटवर कलाकारांनी जबरदस्त शॉट दिला तेव्हा भन्साळींनी त्यांना ५०० रुपये बक्षीस म्हणून दिले”.
जयती भाटिया म्हणाल्या, “जेव्हा त्याला कोणताही शॉट आवडतो तेव्हा तो ठीक आहे असे म्हणत नाही. तो बक्षीस म्हणून ५०० रुपये देतो. शुटिंगमध्ये जेव्हाही कोणत्याही अभिनेत्याने चांगला शॉट दिला तेव्हा भन्साळीने नेहमीच बक्षीस दिले आणि त्यांना तीनदा हा सन्मान मिळाला असल्याचे अभिनेत्रीने सांगितले. यापूर्वी, या शोमध्ये उस्तादजींची भूमिका साकारणारा अभिनेता इंद्रेश मलिक यानेही खुलासा केला होता की, जेव्हा भन्साळी त्यांच्या शॉटवर खूश होते तेव्हा त्यांनी त्यांना ५०० रुपयांचे बक्षीस दिले होते.
अभिनेत्री जयति भाटिया यांनी एका मुलाखतीत सांगितलं, “संजय भन्साळी त्यांच्या कलाकारांवर खूप प्रेम करतात. मी जेव्हा त्यांना सेटवर भेटायचे तेव्हा मला ते मिठी मारायचे. माझ्या गालावर किस करायचे. जेव्हा आमच्यापैकी कोणी उत्तम शॉट द्यायचा तेव्हा भन्साळी त्यांच्या खिशातून ५०० रुपये काढून द्यायचे. मला तीन वेळा ५०० रुपये मिळाले होते”. ‘हिरामंडी’ ही एक ब्रिटीश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्य चळवळीच्या काळात लाहोरच्या हीरामंडी येथील गणिकाच्या जीवनावर आधारित वेबसीरिज आहे. या मालिकेत अदिती राय हैदरी, रिचा चढ्ढा, मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, शर्मीन सहगल, संजीदा शेख, ताहा शाह बदुशा, फरीदा जलाल, शेखर सुमन आणि अध्यायन सुमन दिसले आहेत.