‘हॅरी पॉटर’ हा चित्रपट सगळ्यांच्या तोंडीपाठ आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच याचे फॅन आहेत. केवळ अमेरिका नव्हे, तर भारतासह जगातील अनेक मुलांचं बालपण याच ‘हॅरी पॉटर’ने अविस्मरणीय केलं आहे. याची क्रेझ आजही कायम असून अशातच या चित्रपटाच्या दर्दी चाहत्यांसाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणाऱ्या एका मोठ्या कलाकाराचे निधन झाले आहे. (‘Harry Potter’ fame Michael Gambon passed away)
‘हॅरी पॉटर’ चित्रपटात ‘मिस्टर डंबलडोअर’ हे पात्र साकारणाऱ्या प्रसिद्ध हॉलिवुड अभिनेते मायकेल गॅम्बॉन यांचे वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले आहे. ते गेल्या काही महिन्यांपासून एका गंभीर आजाराचा सामना करत होते. गॅम्बॉन यांनी हॅरी पॉटर मालिकेतील सहा चित्रपटांत काम केले होते. सशक्त आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याच्या निधनामुळे हॉलिवूडसह हॅरी पॉटरच्या जगभरातील चाहत्यांवर मोठी शोककळा पसरली आहे.
हे देखील पाहा – Video : गणपतीसाठी कोकणातील गावी गेलेल्या अविनाश नारकरांचा ‘पप्पांनी गणपती आणला’ गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “ऐश्वर्या मॅडम…”
मायकेल गॅम्बॉन यांच्या निधनाचे वृत्त पत्नी लेडी गॅम्बॉन आणि मुलगा फर्गस यांनी पब्लिसिटी क्लेअर डॉब्स यांना दिली होती. “आम्हाला सर मायकेल गॅम्बॉन यांच्या निधनाचे वृत्त जाहीर करताना अत्यंत दु:ख होत आहे. ते एक प्रेमळ वडील आणि पती होते. त्यांचा मृत्यू न्युमोनिया या आजारामुळे झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांची प्राणज्योत मालवली.”, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
हे देखील पाहा – रणबीर कपूरच्या वाढदिवसानिमित्त आलिया भट्टने शेअर केले दोघांचे Unseen फोटोज्, पोस्ट शेअर करत म्हणाली, “माझा चांगला…”
गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या अभिनयाने मायकल यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांची ‘हॅरी पॉटर’ चित्रपटातील ‘मिस्टर डंबलडोअर’ ही भूमिका प्रचंड गाजली. त्यांच्या निधनानंतर हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.