मराठी मालिकाविश्वातील सर्वात क्युट जोडी म्हणजे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून नावारूपात आलेली राणा-अंजलीची ही लव्हस्टोरी प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. तेव्हापासूनच या जोडीचा एक मोठा फॅन फॉलोविंग निर्माण झाला. दोघांची ऑनस्क्रीन गट्टी जितकी जमली होती, तितकीच ती ऑफस्क्रीनसुद्धा जमली होती. मालिका संपल्यानंतर चाहते ह्या जोडीला खूप मिस करत होते. पण जेव्हा दोघांनी आपल्या लग्नाची घोषणा केली होती, तेव्हा चाहत्यांना खूप आनंद झाला. (hardeek joshi and akshaya deodhar)
२०२२ मध्ये हार्दिक व अक्षया लग्नबंधनात अडकली असून त्यांच्या लग्नाच्या फोटोजची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. लग्नानंतर ही क्युट जोडी देवदर्शन, सणवार साजरे करण्याचे व विविध ठिकाणचे फोटोस शेअर करतात, ज्याची चर्चा सोशल मीडियावर अनेकदा रंगते. नुकतंच हार्दिक व अक्षया जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाला गेले असून त्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होतायंत.
हे देखील वाचा : अक्षया-हार्दिकचा पहिला गुढीपाडवा,पारंपरिक लूकने वेधलं लक्ष
हार्दिक व अक्षया यांनी सहकुटुंब जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर दोघांनी भंडाऱ्याची उधळण केली. दर्शनावेळी अक्षयाच्या लुकने सर्वांचे लक्ष वेधले होते. कारण, जेजुरीचे दर्शन घेण्यावेळी अक्षयाने तिच्या आईची २५ वर्ष जुनी साडी नेसलेली होती. हा लुक तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करून लिहिलंय, “आईची २५ वर्ष जुनी साडी ❤”. अक्षयाच्या हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला. त्याचबरोबर हार्दिकचा पांढऱ्या कुर्तावरील लूकही समोर आला असून तोसुद्धा चाहत्यांच्या पसंतीस उतरला. (akshaya wears her mom 25 year old saree)
हार्दिक-अक्षया ही जोडी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून अनेक फोटोज व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. हार्दिकने मालिकांबरोबर हिंदी व मराठी सिनेमातही काम केलं असून लवकरच तो ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमात एका महत्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षया सध्या पडद्यावर फारशी सक्रिय नसली, तरी चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहे.