मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हेमांगी कवीला लॉट्री, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करताना दिसणार, फोटो शेअर करत म्हणाली, “काय सांगू तुम्हाला जिथे…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 11, 2023 | 1:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hemangi Kavi Ad Shoot with Amitabh Bachchan

हेमांगी कवीला लॉट्री, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करताना दिसणार

रंगभूमी असो वा रुपेरी पडदा, किंवा ओटीटी, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने या सर्वच माध्यमांत निवडक भूमिका साकारली आहे. मात्र, त्या सर्व भूमिकांमधून तिने आपल्या अभिनयाची दमदार छाप पाडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. केवळ उत्तम अभिनेत्री म्हणून तिची ओळख नाही, तर उत्तम नृत्यांगणा व विनोदी कलाकार म्हणून तिला प्रेक्षक ओळखतात. त्याचबरोबर ती अनेक जाहिरातींमध्ये देखील झळकलेली आहे. काही दिवसांपूर्वी हेमांगी क्रिकेटपटू युवराज सिंगसह एका जाहिरातीत झळकली होती. त्यानंतर ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर आणखी एका जाहिरातीत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. (Hemangi Kavi Ad Shoot with Amitabh Bachchan)

सोशल मीडियावर सक्रिय असलेली हेमांगी नेहमी तिच्या कामाची माहिती चाहत्यांना देत असते. शिवाय, तिच्या खासगी आयुष्यातील अनेक फोटोज व रील्स शेअर करण्याबरोबर विविध मुद्द्यांवर आपलं बिनधास्त मत मांडताना दिसते. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ ज्यांनी बॉलिवूड गाजवली आहे, त्या महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हेमांगीने त्यांना शुभेच्छा देत एक खास पोस्ट शेअर केली, जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

हे देखील वाचा – मराठी मुलीबरोबर तीन वर्ष अफेअर, लग्नही होणार होतं पण…; अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ नात्याबाबत मित्रानेच केला होता मोठा खुलासा

अभिनेत्री हेमांगी कवी लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासह एका जाहिरातीमध्ये झळकणार आहे. त्या जाहिरातीचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे. हेमांगीने या शूटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केली आहे. हेमांगी या पोस्टमध्ये म्हणाली, “क्या सांगू तुम्हाला… तो आनंद, आश्चर्य, अस्वस्थता, धक्का आणि आदर याने मी भरून गेले आहेत! जिथे शब्द संपतात!”, असं म्हणत तिने अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओची सविस्तर पोस्ट उद्या शेअर करणार असल्याची माहितीदेखील तिने दिली आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. त्याचबरोबर मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही कमेंटद्वारे तिचे कौतुक करत आहे.

हे देखील वाचा – “मध्यरात्री २.३० वाजता…”, दीड महिन्यानंतर अमेरिकेहून मुंबईमध्ये आला संकर्षण कऱ्हाडे, म्हणाला, “भारतात आल्यानंतर…”

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

हेमांगीचं ‘जन्मवारी’ हे नाटक रंगभूमीवर सध्या सुरु असून त्यानिमित्ताने ती राज्यातील विविध ठिकाणी दौरे करताना दिसते. त्याचबरोबर, काही महिन्यांपूर्वी ओटीटीवर आलेल्या ‘ताली’ वेबसीरिजमधील तिची भूमिका प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरली.

Tags: Ad shootinghemangi kaviHemangi Kavi Ad Shoot with Amitabh Bachchanmarathi actress
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Aamir khan announced his daughter marriage date

"खूप रडणार कारण…", लेकीच्या लग्नाची तारीख सांगत आमिर खानचं होणाऱ्या मराठमोळ्या जावयाबाबत भाष्य, म्हणाला, "मला कोण सांभाळणार?"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.