Hansika Motwani New Home : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या हंसिका मोटवानीने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर टॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला आहे. हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटातील बालकलाकार होण्यापासून ते टॉलिवूडमधील स्टार बनण्यापर्यंतचा अभिनेत्रीचा प्रवास हा तिच्या प्रतिभेचा व मेहनतीचा पुरावा आहे. आजही प्रेक्षकांना तिचे चित्रपट पाहायला आवडतात. हंसिकाने ४ डिसेंबर २०२२ रोजी तिच्या स्वप्नातील राजकुमार सोहेल कथुरियाबरोबर लग्न केले. अलीकडेच या जोडप्याने नवीन घर विकत घेतले आहे आणि हंसिकाने तिच्या नवीन घराच्या गृहपूजेचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत.
अभिनेत्री हंसिका मोटवानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पती सोहेल कथुरियाबरोबरच्या तिच्या नवीन घराची झलक शेअर केली आहे. फोटोंमध्ये, ती तिच्या घरातील पूजेसाठी पूजा-हवन करताना दिसत आहे. या खास प्रसंगी हंसिकाने हिरव्या रंगाची सिल्क साडी नेसली होती ज्यावर सोनेरी रंगाची काळी सुंदर नक्षी होती. तिने यावर वेगळ्या गुलाबी रंगाचा ब्लाउज घातला आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. हंसिका मोटवानीने गजरा, भरपूर बांगड्या आणि सोन्याचा नेकलेसने तिच्या लूकमध्ये भर घातली आहे.
आणखी वाचा – लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला आयरा खानची नवऱ्यासाठी खास पोस्ट, Unseen Photo केले शेअर
काही दिवसांपूर्वी हंसिका मोटवानीने तिच्या IG स्टोरीजवर तिच्या घरातील नवीन पाहुण्यांची झलक दाखवली होती. अभिनेत्रीने सुंदर पांढऱ्या रंगाची महागडी अलिशान कार खरेदी केली आहे जी उत्कृष्ट इंजिन आणि आलिशान इंटीरियरसाठी ओळखली जाते. तिच्याकडे उच्च दर्जाच्या चारचाकी गाड्याही आहेत. अभिनेत्रीच्या कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि त्यानंतर अभिनेत्रींच्या नव्या घराचे गृहप्रवेशाचे फोटो समोर आले आहेत.
आणखी वाचा – सारा अली खानच्या नवीन प्रॉपर्टीची किंमत ऐकून व्हाल थक्क, मुंबईत खरेदी केली इतकी महागडी जागा
हंसिका मोटवानीने बाल कलाकार म्हणून टीव्ही इंडस्ट्रीत प्रवेश केला. २००० मध्ये ती ‘शका लाका बूम बूम’मध्ये दिसली होती. यानंतर तिने एकता कपूरच्या ‘सास भी कभी बहू थी’ या लोकप्रिय मालिकेत काम केले. हंसिका शेवटची २०२४ मध्ये ‘गार्डियन’ या हॉरर चित्रपटात दिसली होती. अभिनेत्रीच्या नव्या घराच्या गृहप्रवेशाचे फोटो पाहून नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत.