Vaibhav Irina Dhananjay Meet : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ संपलं असलं तरी या पर्वाची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळतेय. सगळेच स्पर्धक ‘बिग बॉस’ संपल्यानंतर आपापल्या कामाला लागले आहेत. इतकंच नव्हे तर अनेक स्पर्धकांच्या गाठीभेटीही होताना पाहायला मिळत आहेत. नुकतीच सूरज व पॅडी कांबळेच्या भेटीचा तुफान व्हायरल होताना पाहायला मिळाला. यानंतर आता समोर आलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये इरिना व वैभवने कोल्हापूर गाठलेलं पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर कोल्हापुरात वैभव व इरिना यांनी डीपीच्या घरी जातं त्याची भेट घेतलेली पाहायला मिळाली. वैभव-इरिनाच पोवारांच्या घरी जंगी स्वागत करण्यात आलेलं पाहायला मिळालं.
‘बिग बॉस’ संपल्यानंतर इरिना व वैभव दोघे एकत्र हिंडताना दिसत आहेत. वैभव इरिनाला घेऊन त्याच गाव दाखवत आहे. बारामतीत गेल्यावर इरिना व सूरजची भेटही झाली. यादरम्यान त्याने इरिनाबरोबर एक सुंदर रीलही शूट केला. त्यानंतर इरिना व वैभव डीपीला भेटायला थेट कोल्हापुरात आले. डीपीसह त्याचे संपूर्ण कुटुंब दोघांच्या स्वागताला तत्पर असलेले पाहायला मिळाले. डीपीने वैभव-इरिनाच्या भेटीचा व्हिडीओ त्याच्या युट्युब चॅनेलवरुन शेअर केला आहे.
आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा नव्या घरात गृहप्रवेश, पूजाही करताना दिसली अन्…; फोटोंद्वारे दिसली झलक
या व्हिडीओमध्ये, वैभव व इरिना धनंजयला भेटायला त्याच्या घरी येतात. घरात येतानाच धनंजयच्या कुटुंबाकडून त्यांचं जोरदार स्वागत केलं जातं. घरात जाताना डीपीचे वडील त्यांच्या स्वागतासाठी उभे असतात, तेव्हा वैभव त्यांना नमस्कार करुन त्यांचे आशीर्वाद घेतो. यावेळी घरात डीपीचे संपूर्ण कुटुंब उपस्थित असते, डीपी सगळ्यांची ओळख करुन देतो. डीपीची दोन्ही मुलं इरिना व वैभवच्या पाया पडतात यावेळी त्यांच्यावरील संस्कार पाहायला मिळाले. त्यानंतर डीपीने बायको मुलांसह वैभव, इरिनाबरोबर फोटो घेतले. एकत्र बसून सगळ्यांनी नाश्ता केला. त्यानंतर त्यांनी एकत्र बसून अनेक गप्पा मारलेल्या पाहायला मिळाल्या.
आणखी वाचा – लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला आयरा खानची नवऱ्यासाठी खास पोस्ट, Unseen Photo केले शेअर
डीपीच्या आई-वडिलांनी वैभव-इरिनाला भेटवस्तू देत त्यांचा पाहुणचार केलेला पाहायला मिळाला. इरिनाने तर डीपीच्या पत्नीच्या ‘आईसाहेब वस्त्रम’ या वस्त्रालयाच्या दुकानाला भेट दिली. त्यानंतर वैभव-इरिनाला घेऊन डीपी त्यांच्या सोसायटी फर्निचर या दुकानात पोहोचला. दुकांची संपूर्ण सफर त्या दोघांनी घडवली. या त्यांच्या भेटीचा सुंदर असा व्हिडीओ साऱ्यांच्या पसंतीस पडलेला दिसला.