मनोरंजनसृष्टीत अनेक कलाकार असे असतात जे पडद्यावर एकत्र काम करत असणाऱ्या जोडीदारासोबतच आपलं खरं आयुष्य देखील व्यतीत करतात. अशीच एक जोडी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख. सध्या सर्वत्र चर्चा असलेल्या ‘वेड’ न प्रेक्षकांना चांगलंच वेड लावलं. पण या जोडीबद्दल सुरुवातीला उठलेल्या काही अफवांना. त्यांनी तेव्हा ही जुमानले नाही आणि आता ही या अफवांबद्दल हल्लीच जिनिलियाला एका टॉक शो मध्ये विचारण्यात आले.(Geneliya Deshmukh acting career)

तेव्हा जिनिलिया म्हणाली ‘ लग्न झाल्यानंतर देशमुख कुटुंबा मध्ये आल्यावर काही काळ जिनिलिया चित्रपट सृष्टीपासून बाहेर होती. घर, गृहस्ती मध्ये काही काळ तिला द्याचा होता त्यासाठी तिने हा ब्रेक घेतलेला. रितेश चे वडील राजकारणात असल्यामुळे तिला पुढे चित्रपट किंवा अभिनय करण्यास मनाई करण्यात आली आहे किंवा रितेश ने तिला काम करू नकोस सांगितले आहे अशा अफवा देखील त्या काळात पसरवल्या जात होत्या. पण कामातून ब्रेक घेणं हा सर्वस्वी माझा स्वतःचा निर्णय होता. घरातून किंवा रितेश ने माझ्यावर कोणताही दबाव टाकला न्हवता. असा खुलासा आता जिनिलिया ने केला.
अफवांपासून कोणताही कलाकार वाचलेला नाही. ही जोडीही अफवांच्या अशाच जाळ्यात अडकली आणि कोणतंही लक्ष न देता आज प्रेक्षकांच्या मनात पुरेपूर उतरली. रितेश आणि जिनिलिया महाराष्ट्राचे लाडके दादा वाहिनी म्हणून देखील ओळखले जातात.(Geneliya Deshmukh acting career)