रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

IND vs NZ सामना पाहण्यासाठी गेला होता गौरव मोरे, विराट कोहलीला पाहून भारावला, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “या क्षणाचा…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 16, 2023 | 11:59 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gaurav More share a post fot Virat Kohli

IND vs NZ सामना पाहण्यासाठी गेला होता गौरव मोरे, विराट कोहलीला पाहून भारावला, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "या क्षणाचा…"

सध्या भारतात क्रिकेट विश्वचषकाचे सामने सुरु आहे. त्यामुळे सर्वत्र क्रिकेटची क्रेझ आपल्याला पाहायला मिळत आहे. काल मुंबईत भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना पार पडला होता. ज्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. विशेष म्हणजे, या सामन्यात विराट कोहलीने आपलं ५०वं शतक झळकावलं. ज्याचा जल्लोष मैदानासह सर्वत्र पाहायला मिळाला होता. अभिनेता गौरव मोरेनेही प्रत्यक्ष मैदानात दाखल होत या सामन्याचा आनंद लुटला. यावेळी त्याने या सामन्याचा एक खास व्हिडीओ शेअर केला, जो सध्या व्हायरल होत आहे. (Gaurav More share a post fot Virat Kohli)

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील लोकप्रिय कलाकारांमध्ये ओळखला जाणारा गौरवला क्रिकेटचे प्रचंड वेड आहे. तो अनेकदा क्रिकेट सामन्याच्या स्किटमध्ये क्रिकेट खेळताना दिसलेला आहे. शिवाय, तो बऱ्याचदा प्रत्यक्ष मैदानात क्रिकेटचे सामने पाहताना दिसला. आता त्याने पुन्हा एकदा या रोमांचक सामन्याचा आनंद लुटला.

हे देखील वाचा – “पाणीपुरी, रगडा बटाटा पुरी, बिर्याणी अन् …”, निवेदिता सराफांनी पाहुण्यांसाठी स्वतःच बनवले चविष्ट पदार्थ, व्हिडीओही केला शेअर

View this post on Instagram

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

नुकत्याच पार पडलेल्या उपांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी गौरव वानखेडे स्टेडिअमवर दाखल झाला. यावेळी त्याने या सामन्यातील आनंद लुटतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला. समोर आलेल्या व्हिडीओत विराट कोहली आपलं शतक झळकवत ते साजरा करताना दिसला. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्याने विराट कोहलीसाठी एक खास पोस्टदेखील केली. तो यात म्हणाला, “या क्षणाचा साक्षीदार होताना मला प्रचंड आनंद होत आहे. पण एक भारतीय म्हणून मला याचा अभिमान वाटतो.”

हे देखील वाचा – प्रसाद जवादे-अमृता देशमुखच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, अभिनेत्रीच्या ज्वेलरी डिझाईनने वेधलं लक्ष

शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत असून नेटकरी यावर कमेंट करताना दिसत आहे. त्याचबरोबर, अभिनेते समीर चौघुले यांनी या व्हिडीओवर “तू भाग्यवान आहेस.”, अशी कमेंट केली. तर, हास्यजत्रेतील त्याचा सहकारी ऋषिकांत राऊत याने “तू आपल्या टीमचा लकीचार्म आहेस. आता अंतिम सामन्याला पण जा, म्हणजे आपण नक्की हा विश्वचषक जिंकू.”, अशी कमेंट केली आहे. याआधीही तो विश्वचषकातील एका सामन्यावेळी जोरदार सेलिब्रेशन करताना दिसला होता. सध्या गौरव चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून त्याचा ‘लंडन मिसळ’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Tags: cricket world cupgaurav moreGaurav More share a post fot Virat Kohlivirat kohli
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Arun Kadam And Saie Tamhankar

Video : सई ताम्हणकरच्या गाण्यावर थिरकला अरुण कदमांचा नातू, अभिनेत्रीही जोरजोरात हसू लागली अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.