‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाने अनेक विनोदी व नवख्या कलाकारांना संधी निर्माण करुन दिली. या विनोदी कार्यक्रमातून अनेक विनोदी कलाकारांना लोकप्रियता मिळवून दिली. यापैकीच एक कलाकार म्हणजे गौरव मोरे. ‘I am a गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा, टा ना ना ना…’ या वाक्याने अनेकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली. याकार्यक्रमात गौरवने अनेक स्किट्सद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवले. मात्र नुकतीच गौरवने या कार्यक्रमातून एक्झिट घेत असल्याची घोषणा केली.
गौरवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या हास्यजत्रा सोडण्याच्या निर्णयाविषयी सांगितले. या पोस्टमध्ये त्याने असं मला सांगताना खूप वाईट वाटतय की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधुन आपला निरोप घेत आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो. नव्या प्रवासात नव्या शो साठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असच राहू दे”.

गौरवच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या पोस्टखाली एकाने कमेंट करत “पैसा बहुत कमिनी चीज होती है” असं म्हटलं आहे. चाहत्याच्या या कमेंटला गौरवने “Respect बडी चीज है भाई” असं उत्तर दिलं आहे. तर आणखी एका चाहतीने “निरोप घेऊ नका. तुम्हाला इथे जे प्रेम मिळाले त्याची तुलना कुठल्याही दुसऱ्या कार्यक्रमाबरोबर करता येणार नाही. तुमचा हिंदी कार्यक्रम मी बघते. तो हास्यजत्रे इतका दर्जेदार नाही. मराठी तुमची मायबोली आहे, तुमचं काम मराठीत खूप खुलून येतं. मराठी सिनेमा बघणारे कमी लोक आहेत”. चाहतीच्या या कमेंटला गौरवने “का सोडला असेल ह्याचा पण विचार होऊ द्या” असं उत्तर दिलं आहे.

दरम्यान, गौरवमे हास्यजत्रा सोडत असल्याच्या या पोस्टवर अरुण कदम, प्रसाद खांडेकर, समीर चौघुले, अभिनय बेर्डेसह काही मराठी कलाकारांसह त्याच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्सद्वारे दु:ख व्यक्त केले आहे. तसेच अनेक चाहत्यांनी त्याच्या शोमधील एक्झिटवर नापसंती दर्शवली आहे. त्याचबरोबर अनेकांनी त्याला उपदेशवजा सूचनाही दिल्या आहेत.