‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शोमधून अभिनेता गौरव मोरे घराघरात पोहोचला.त्याने प्रेक्षकांच्या मनातही घर केलं आहे. विनोदीबुद्धी आणि अभिनय कौशल्याने त्याने अल्पावधीतच कलाविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. विनोदाचं अचूक टायमिंग आणि त्यांची हेअरस्टाईल त्याला लोकप्रिय करत गेली. गौरव मोरे सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.गौरवने त्याच्या इन्स्टास्टोरीवर एक लेटेस्ट व्हिडीओ शेअर केला. यात त्याची एक इच्छा पूर्ण झाली आहे.(Gaurav More Sudesh Bhosle)
एका कार्यक्रमात गौरव मोरे आणि सुदेश भोसलें यांची भेट झाली. बॉलिवूडमध्ये गाजलेला बुलंद आवाज म्हणून सुदेश भोसले यांना ओळखलं जातं. एखाद्या कलाकाराच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करण्याच्या आपल्या कलेने सुदेशजींनी सगळ्यांची मने जिंकली. महानायक अमिताभ बच्चन यांचा आवाज म्हणून ते नावारूपाला आले. ‘जुम्मा चुम्मा’ ‘शावा शावा’ ‘पी ले पी ले ओ मेरी जानी’ यांसारखी अनेक सदाबहार गाणी त्यांनी गायली आहेत.अनेक फॅन्सप्रमाणे गौरवदेखील त्यांचा मोठा फॅन आहे. यावेळी सुदेश यांच्या सोबत गौरव डान्स करताना देखील दिसतो. हा व्हिडीओ गौरवने त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून शेअर केला.
‘शिर्डी महोत्सव २०२३…ज्यांना बघुन आपण मोठे झालो. आपल जेवढ वय आहे तेवढा अनुभव असलेले सुदेश सर यांच्यासोबत मंच शेअर करायला मिलन हे मी माझं भाग्यच समजतो.खूप खूप प्रेम सर आणि धन्यवाद मी कालची ही रात्र कधीचं विसरू शकणार नाही.’ असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला देत त्याच्या भावना मांडल्या आहेत. त्यांचा हा डान्स व्हिडीओ चाहत्यांना देखील आवडला.(Gaurav More Sudesh Bhosle)
हे देखील वाचा- गर्भवती अभिनेत्रीला धो धो पाऊसात ही निळू फुलेंनी केली होती मदत
यासोबत सुदेश भोसले हे देखील हास्यजत्रेचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांनी हास्यजत्रेच्या कार्यक्रमाला देखील हजेरी लावली होती. इटस मज्जाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हास्यजत्रेच्या कलाकारांबद्दलच्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत.