अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या अकाली निधनामुळे त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी व त्यांचे कुटुंब मोठ्या प्रमाणावर ट्रोल होताना पाहायला मिळाले.या सर्व प्रकारानंतर ‘ते माझे वडील आणि माझ्या आईचे पती होते आम्ही त्यांना जास्त ओळखतो’ असं म्हणत त्यांनी ट्रोलिंगला उत्तर दिले होते. तरी हा प्रकार सुरु होताच. (gashmeer mahajani about troll)
आता अनेक दिवसांनी गश्मीरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून ask me question च्या माध्यमातून चाहत्यांशी सवांद साधला आणि अनेक प्रश्नांची त्याने परखडपणे उत्तर दिलेली देखील पाहायला मिळाली.वडिलांच्या निधन, ट्रोलिंग यासर्व प्रकारानंतर गश्मीरने पहिल्यांदा असा खुला सवांद साधेलला पाहायला मिळाला.
पाहा काय म्हणाला गश्मीर? (gashmeer mahajani about troll)
यामध्ये गश्मिराला, तुम्हला सिनेसृष्टीमधून आधार दिला का? तुम्ही मोठ्या पडद्यावर पुन्हा कधी दिसणार?वडिलांशी संबंधित प्रश्न, असे बरेच प्रश्न विचारण्यात आले आणि गश्मीरने देखील या प्रश्नांना स्पष्ट उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.त्यात काहींनी अपशब्द वापरत देखील त्याच्या बदल वक्तव्य केलं आहे. यावर उत्तर देताना गश्मीर म्हणाला.ही व्यक्ती फक्त १३ ते १४ वर्षांची आहे. आता यांचं काय करायचं? मला खरंच काळजी वाटते की यांच्या पालकांना माहित तरी असेल का यांची मुलं काय करतात?(gashmeer mahajani about troll)
सोशल मीडियाच्या पाठी चेहरे लपवून कलाकारांच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलणं हे सध्या सरास सुरु असतं.आणि त्यासाठी वयाचं कोणतं ही बंधन पाळलं जात नाही. आपल्या कडे असणाऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपण दुरुउपयोग करतोय हे समजण्या इतकंही भान सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करताना राखलं जात नाही.
हे देखील वाचा : “माझ्या दुःखाच्या काळात मराठी सिनेसृष्टी…”, वडिलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनीचं वक्तव्य, म्हणाला, “कलाकारांनी…”