शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हृतिक रोशनच्या पहिल्या चित्रपटानंतर राकेश रोशन यांच्यावर झाला होता गोळीबार, अभिनेत्यानेच केला होता खुलासा, म्हणालेला, “एक गोळी छातीमध्ये आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 1, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hrithik roshan on rakesh roshan

हृतिक रोशनच्या पहिल्या चित्रपटानंतर राकेश रोशन यांच्यावर झाला होता गोळीबार, अभिनेत्यानेच केला होता खुलासा, म्हणालेला, "एक गोळी छातीमध्ये आणि..."

बॉलिवूडमधील राजबिंडा अभिनेता म्हणून हृतिक रोशनचे नाव सहज ओठांवर येते. २००० साली ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश केला. हृतिकचे वडील राकेश रोशन हे बॉलिवूडमधील यशस्वी निर्मात्यांपैकी एक. त्यांनी हृतिकला चित्रपटसृष्टीमध्ये आणण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट बनवण्यासाठी राकेश यांनी घरातील फर्निचरचीही विक्री केली होती. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही आठवड्यांतच  राकेश यांच्यावर गोळीबार करण्यात आला. याबद्दलचा खुलासा स्वतः हृतिकने केला आहे. (Hrithik roshan on rakesh roshan)

‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाला भरघोस यश मिळाले. यामध्ये हृतिकबरोबर अमीषा प्रमुख भूमिकेमध्ये दिसून आली होती. आमिष व हृतिकचा हा पहिला चित्रपट होता. वडिलांवर झालेल्या हल्ल्याबद्दल सांगितले की, “१९९९ साली त्यांनी मला चित्रपट सृष्टीमध्ये आणायचे होते तेव्हा चित्रपटाच्या फंडिंगसाठी ते कर्जबाजारी झाले. त्यांनी घरातील फर्निचरदेखील विकले होते. सर्व कुटुंबीयांना फरशीवर झोपावे लागत असे. पण या सर्व संघर्षाचा फायदा झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो सुपरहिट झाला होता. पण काही आठवड्यातच त्यांना गोळ्या मारण्यात आल्या”.

आणखी वाचा – आलिशान घर, हॉलमध्येच कित्येक ट्रॉफी अन्…; इतकं मोठं व प्रशस्त आहे कार्तिकी गायकवाडचं घर, बेडरुमचीही दिसली झलक

View this post on Instagram

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

तो पुढे म्हणाला की, “गँगस्टर अली बाबा बुदेशच्या माणसांनी वडिलांच्या ऑफिसच्या जवळ गोळ्या मारल्या होत्या. एक गोळी त्यांना छातीमध्ये लागली तर दुसरी गोली त्यांच्या हाताला लागली. ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाला झालेल्या फायद्यातील हिस्सा ते मागत होते. ते देण्यासाठी वडिलांनी नकार दिला. या रागामध्ये त्यांनी वाडिलांवर गोळ्या झाडल्या. काही आठवड्यानंतर ते घरी परतले”.

आणखी वाचा – ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नाच्या दोन वर्षांनंतर दिली गुडन्यूज, गोंडस बाळाला दिला जन्म, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर त्यांनी २००३ साली दिग्दर्शक म्हणून ‘कोई मिल गया’ या चित्रपटाची धुरा त्यांनी सांभाळली. हा चित्रपट देखील खूप हिट झाला. यामध्ये हृतिकबरोबर प्रीती झिंटा प्रमुख भूमिकेत होती. त्यानंतर या चित्रपटाचा पुढील भाग ‘क्रिश’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडले. यानंतर ‘क्रिश ३’ देखील प्रदर्शित करण्यात आला. आता प्रेक्षक ‘क्रिश ४’ ची आतुरतेने वाट पाहत आहे.

Tags: firingfirst moviegangsterHrithik Roshankaho na pyar hairakesh roshan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
Today 02 April 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

आज ‘या’ राशीच्या लोकांना करिअर व व्यवसायात यश मिळू शकते, जाणून घ्या तुमचे आजच्या दिवसाचे राशी भविष्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.