२२ वर्षांपूर्वी सुपरहिट ठरलेल्या सनी देओल आणि आमिष पटेल यांचा ‘गदर : एक प्रेम कथा’ सिनेमाच्या सिक्वेलची सध्या जोरदार चर्चा होतेय. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गदर २’ सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत असून सिनेमाचा टिझर रिलीज झाल्यापासून चाहते आणखीनच उत्सुक आहेत. पण सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच एक मोठा वाद समोर आलाय.(Gadar 2 Amisha Patel Controversy)
सिनेमाची नायिका आमिष पटेलने दिग्दर्शक अनिल शर्मा व त्यांच्या प्रोडक्शन हाऊसवर गैरव्यवस्थापनाचे आरोप केले होते. अनिल शर्मांच्या प्रोडक्शन हाऊसने आजपर्यंत मेकअप आर्टिस्टपासून ते कपडे डिझाइन करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत असंख्य लोकांचे पगार दिलेले नाहीत तसेच सिनेमाच्या शूटिंग दरम्यान आमच्यासह अनेकांची प्रचंड गैरसोय झाली असल्याचे आरोप तिने केले.
यावर निर्माते व दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना तिने केलेल्या आरोपांवर आपले मौन सोडले. ते म्हणाले, “अमीषाने हे सर्व का केले याची मला खरंच कल्पना नाही. मी फक्त एवढेच सांगेन की, तिने केलेले सर्व आरोप खोटे आहेत. यात काही तथ्य नाही. मी तिचे आभार मानतो कारण तिने केलेल्या आरोपांमुळे माझ्या प्रोडक्शन हाऊसला प्रसिद्धी मिळाली. यापेक्षा मोठे काय असू शकते ?”
‘गदर २’ मध्ये सनी देओल, आमिष पटेल यांच्याशिवाय दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्षही दिसणार असून सिनेमा येत्या ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(Gadar 2 Amisha Patel Controversy)