रविवार, मे 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर अभिनेत्री ईशा डे आणि अभिषेकचा विवाहसोहळा संपन्न; पारंपरिक अंदाजात पार पडलं लग्न; फोटो समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 12, 2026 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Esha dey wedding

ईशा डे आणि अभिषेकचा विवाहसोहळा संपन्न

Esha dey wedding : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील अभिनेत्री ईशा डे आता लग्नबंधनात अडकली आहे अखेर ईशाच्या लग्नसोहळ्याचे पहिले फोटो समोर आले असून चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ईशाने लेखक आणि गीतकार अभिषेक खणकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांचा विवाहसोहळा पाचगणी येथे पार पडला. ईशाच्या लग्नातील काही खास क्षण अभिनेत्री वनिता खरातने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

ईशाच्या लग्नाला मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. वनिता खरातसह प्रियदर्शिनी इंदलकर, रोहित माने, सचिन गोस्वामी, समीर चौघुले, मकरंद देशपांडे, आकांक्षा गाडे यांसारखे कलाकार या सोहळ्यात सहभागी झाले होते. मित्रमैत्रिणी आणि सहकलाकारांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा आनंदात पार पडला. लग्नात ईशाने पारंपरिक मराठमोळा लूक केला होता. लाल रंगाची सुंदर नऊवारी साडी, त्यावर सोनेरी काठाची शाल, गळ्यात हार, नाकात नथ आणि हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा असा तिचा साज होता. या पारंपरिक वेशात ईशा खूपच सुंदर दिसत होती.

आणखी वाचा – महाकुंभच्या मोनालिसाने मुस्लिम प्रियकराशी केले लग्न, फोटो समोर येताच बसला धक्का, फोटो समोर

दरम्यान, ईशाचा नवरा अभिषेक खणकर हा मराठी मालिकांसाठी गीतकार म्हणून काम करतो. ‘खुलता कळी खुलेना’ आणि ‘लक्ष्मी निवास’ यांसारख्या मालिकांसाठी त्याने गीते लिहिली आहेत. तसेच ईशा आणि अभिषेक यांच्या लग्नानिमित्त मराठी कलाविश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहतेही या नव्या आयुष्यासाठी दोघांना भरभरून शुभेच्छा देताना दिसत आहेत.

आणखी वाचा – ‘मी जिवंत आहे’ म्हणत २४ तासांनी आली समोर; हनिमूनवर नवऱ्याला तुरुंगात पाठवणारी पूनम पांडे पुन्हा चर्चेत

Tags: Esha dey weddingmarathi actressmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
salbardi Marathi Movie

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर ओंकार भोजने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'सालबर्डी' चित्रपटात शशांक शेंडेंबरोबर करणार स्क्रीन शेअर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.