गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

१५ व्या वर्षी वडिलांनी घर सोडलं, आईने विष देण्याचा…; ‘शक्तिमान’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली…

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 27, 2026 | 4:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shkatiman Fame Actress Untold Story

'शक्तिमान' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Shkatiman Fame Actress Untold Story : ‘शक्तिमान’ या लोकप्रिय मालिकेत ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे वैष्णवी मॅकडोनाल्ड. पडद्यावर धाडसी आणि आत्मविश्वासपूर्ण दिसणाऱ्या वैष्णवीचं खरं आयुष्य मात्र संघर्ष, वेदना आणि चमत्कारिक वळणांनी भरलेलं आहे. १९९७ ते २००५ या काळात प्रसारित झालेल्या ‘शक्तिमान’मुळे वैष्णवी घराघरात पोहोचली. मात्र अभिनय क्षेत्रात यश मिळण्याआधी तिचं बालपण फारच कठीण गेलं. आई-वडिलांमधील सततच्या भांडणांचा परिणाम थेट तिच्या शिक्षणावर झाला. घरातील वातावरण इतकं तणावपूर्ण होतं की कुटुंबाला वारंवार हॉटेल बदलत राहावं लागे.

एका मुलाखतीत वैष्णवीने सांगितलं की चौथीपासून दहावीपर्यंत ती नियमित शाळेत जाऊ शकली नाही. राहण्यासाठी कायमस्वरूपी घर नसल्याने शिक्षण थांबलं गेलं. तरीही अभ्यासात ती हुशार होती आणि तिला अभिनेत्री नव्हे, तर शास्त्रज्ञ बनायचं स्वप्न होतं. कुटुंब हैदराबादजवळ भाड्याच्या घरात राहणार असं वाटत असतानाच आयुष्याने आणखी एक धक्का दिला. वैष्णवी अवघी १४ वर्षांची असताना तिचे वडील कोणालाही काही न सांगता निघून गेले. ते परत कधीच सापडले नाहीत. या घटनेने संपूर्ण कुटुंब हादरला. आर्थिक अडचणींमुळे तिच्या आईने कर्ज घेतलं आणि दोन्ही मुलींना घेऊन मुंबई आली. तिथे लॉजमध्ये राहून त्यांनी वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण हाताशी पैसा नव्हता आणि मदतीला कोणीच नव्हतं.

आणखी वाचा – विजय देवरकोंडा इंस्टाग्रामवर बायकोला करत नाही फॉलो, लग्नानंतर सुरु झाल्या चर्चा, मात्र रश्मिका…

View this post on Instagram

A post shared by Vaishnavi Macdonald (@vaishnavimacdonald_official)

परिस्थिती इतकी बिकट झाली की भाडं आणि अन्नासाठीही पैसे उरले नाहीत. निराश झालेल्या तिच्या आईच्या मनात अत्यंत टोकाचा विचार आला. स्वतःसह दोन्ही मुलींचं आयुष्य संपवण्याचा विचार तीच आईने केला. ही बाब वैष्णवीला अनेक वर्षांनी कळली. त्या वेळी ती १६ वर्षांची आणि तिची बहीण १२ वर्षांची होती. आईने मुलींना चुकीचं काही होऊ नये म्हणूनच हा विचार मनात आणला होता, अशी कबुली तिने नंतर दिली. हा प्रसंग वैष्णवीच्या आयुष्यातील सर्वात धक्कादायक वळण ठरला. या कठीण काळात वैष्णवीची आई दोन्ही मुलींना घेऊन जवळच्या चर्चमध्ये गेली. तिथे वैष्णवीला एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव आल्याचं ती सांगते. तिला ईश्वराची उपस्थिती जाणवली आणि तिच्या मनात नव्या आशेचा किरण निर्माण झाला.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi: राकेशने तन्वीला केलं KISS, राखीचा विश्वासघात; रागाच्याभरात स्वतःलाच दिली शिक्षा अन्…

लॉजवर परतल्यानंतर त्यांच्या दरवाज्याबाहेर १०० रुपयांच्या नोटांचं एक बंडल सापडलं. विशेष म्हणजे, बिल भरण्यासाठी जितकी रक्कम आवश्यक होती, तेवढेच पैसे त्या बंडलमध्ये होते. हा प्रसंग त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. काही आठवड्यांतच त्या 1-BHK फ्लॅटमध्ये राहायला गेल्या. वैष्णवीसाठी हा अनुभव एखाद्या चमत्कारासारखा होता. बालपणातील अस्थिरता, आर्थिक संकटं आणि मानसिक ताण यांचा सामना करत वैष्णवीने स्वतःला सावरलं. पुढे तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि ‘शक्तिमान’मधील गीता विश्वास ही भूमिका तिच्या कारकिर्दीतील महत्वाची ठरली. पडद्यावर दिसणाऱ्या तिच्या आत्मविश्वासामागे अशा असंख्य वेदना आणि संघर्ष दडलेले आहेत. आजही तिची कथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते, कारण परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा आणि श्रद्धा यामुळे आयुष्याला नवं वळण मिळू शकतं.

Tags: bollywood actressbollywood newsShkatiman Fame Actress Untold Story
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Rashmika-Vijay First Video After Wedding

Video : लग्नानंतर पहिल्यादांच कॅमेरासमोर आलं नवविवाहित जोडपं, रश्मिका-विजयच्या चेहऱ्यावरील ग्लोची चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.