बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र आता त्याची भाची अलिजेह अग्निहोत्री सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, ‘खान’ कुटुंबातील नवी पिढी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘फर्रे’ नावाची पोस्ट शेअर करत होते. त्यामुळे अनेकांना हे नक्की काय आहे? असा प्रश्न पडला होता. मात्र, आता सलमानचे एक व्हिडिओ शेअर करत हे गुपित उलगडलं आहे. (Farrey Teaser)
सलमानने नुकताच ‘फर्रे’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या चित्रपटातून त्याने भाची अलिजेहला बॉलिवूडमध्ये लाँच केला आहे. दरम्यान, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरी चित्रपटाच्या टीझरमधून अलिजेहची झलक स्पष्ट दिसत आहे. तिचा हा पहिलाच चित्रपट चित्रपटाची निर्मिती ‘सलमान खान फिल्म्स’च्या बॅनरअंतर्गत करत आहे. दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सौमेंद्र पाधी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
हे देखील वाचा – “पाठिवर, पदरावर गणपती नसावा आणि…”, ब्लाऊजवर बाप्पाची डिझाइन पाहून अश्विनी महांगडेला चाहतीने सुनावलं, अभिनेत्री म्हणाली, “यापुढे…”
‘फर्रे’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची कथा शाळकरी मुलांभोवती फिरत आहे. टीझरमध्ये अलिझेह खूपच घाबरलेली दिसत असून प्रेक्षकांना या चित्रपटात आणखी काय पाहायला मिळणार, हे प्रदर्शित झाल्यानंतरच कळणार आहे. चित्रपटात अलिझेहसह झेन शॉ, साहिल मेहता, प्रसन्ना बिश्त, रोनित रॉय आदी मुख्य भूमिकेत आहेत.
हे देखील वाचा – टीव्ही अभिनेता करण कुंद्राने मुंबईमध्ये समुद्रकिनारी खरेदी केले आलिशान घर, किंमत आहे तब्बल इतके कोटी
दरम्यान, काल सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाबद्दलची एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर काही तासांनी त्याने चित्रपटाचा टीझर रिलीज केला. हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.