शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मुलांची आठवण येते पण…”, घटस्फोटांच्या चर्चांवर फरदीन खानने सोडलं मौन, म्हणाला, “वाईट वाटतं…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 17, 2024 | 4:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Fardeen Khan divorce rumors actor said that he misses his children and he does not live with them

फरदीन खानने मुलांबरोबर राहत नसल्यामुळे त्यांची फार आठवण येत असल्याचं सांगितलं आहे

बॉलिवूड अभिनेता फरदीन खान हा त्याच्या खासगी आयुष्यातील काही कारणामुळे चर्चेत आला आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे अभिनेत्याच्या घटस्फोटांच्या अफवा. फरदीनने पत्नीला रोमँटिक पद्धतीने लग्नाची मागणी घातल्यानंतर त्यांनी २००५ साली धुमधडाक्यात लग्न केलं होतं. त्यानंतर फरदीन त्याची पत्नी नताशा माधवानीपासून वेगळा होत असून हे जोडपे लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाल्या होत्या. अशातच आता फरदीन खानचा घटस्फोट झाला असून, तो आपल्या कुटुंबाबरोबर राहत नाही अशी चर्चा रंगली आहे. नुकतंच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत फरदीन खानने आपण मुलांबरोबर राहत नसल्यामुळे त्यांची फार आठवण येत असल्याचं सांगितलं आहे. यामुळें अभिनेत्याच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. (Fardeen Khan News)

फरदीन खानने मुलाखतीत सांगितलं की, “हे फार सोपं नाही. ते माझ्यापासून दूर का आहेत याच्यात मला जायचं नाही. पण हो, हे फार सोपे नाही. मला त्यांची फार आठवण येते. दर चार ते सहा आठवड्यांनी मी त्यांना भेटतो. आम्ही रोज व्हिडीओ कॉलद्वारे बोलतो. पण ते माझ्या रोजच्या आयुष्याचा भाग नाहीत. त्यांना मोठं होताना न पाहणं, त्यांची ओळख निर्माण करण्यात मदत करणं या सर्वांबद्दल फार वाईट वाटतं. माझी मुलं चित्र काढतात. मी त्यांनी काढलेली चित्रं मुंबईतील घराच्या भिंतीवर लावली आहेत”

View this post on Instagram

A post shared by Fardeen F Khan (@fardeenfkhan)

आणखी वाचा – Satvya Mulichi Satavi Mulgi मालिकेत मोठा ट्विस्ट! राजाध्यक्षांच्या कुटुंबात केदारची एन्ट्री, ‘हा’ अभिनेता साकारत आहे भूमिका

मुलांपासून दूर राहत असल्याची आपली खंत व्यक्त करताना फरदीन असं म्हणाला की, “मला त्यांच्या मिठ्या, चुंबनं यांची आठवण येते. लक्ष विचलित करण्यासाठी मी सतत काम करत असतो. पण जेव्हा कधी ते मुंबईत येतात तेव्हा मी सर्व काम बाजूला ठेवतो आणि त्यांच्यासाठी २४ तास उपलब्ध असतो”. फरदीन खानने अभिनेत्री मुमताज यांची मुलगी नताशा माधवानीबरोबर लग्न केलं आहे. त्यांना दोन मुलं आहेत. फरदीन खान नुकताच ‘खेल खेल में’ चित्रपटामध्ये अक्षय कुमार, तापसी पन्नू, वाणी कपूर यांच्याबरोबर दिसला होता.

आणखी वाचा – सारा अली खानच्या नवीन प्रॉपर्टीची किंमत ऐकून व्हाल थक्क, मुंबईत खरेदी केली इतकी महागडी जागा

दरम्यान, फरदीन खानने संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेबसीरिजमधून तब्बल १४ वर्षांनंतर  पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं. सध्या अभिनेता ‘हाऊसफुल ५’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफुल’चा एक भाग आहे. आगामी वर्षी म्हणजेच २०२५ जून मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Hansika Motwani New Home

Video : सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा नव्या घरात गृहप्रवेश, पूजाही करताना दिसली अन्…; फोटोंद्वारे दिसली झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.