शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

युट्यूबर अरमान मलिकच्या चौथ्या लग्नाचं गुपित काय?, बायको पायलनेही केलं भाष्य, म्हणाली, “दोन बायका असूनही…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 29, 2024 | 2:21 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
armaan malik fourth wife

चौथ्या बायकोबद्दल अरमान मलिकने स्वतः केलं भाष्य

अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींबरोबर ‘बिग बॉस ओटीटी २’ च्या घरात आला होता. अरमान दोन्ही पत्नींबरोबर ‘बिग बॉस’च्या घरात दाखल झाल्याने त्याच्यावर जोरदार टीका ही करण्यात आली होती. अरमान मलिकने पायलबरोबर घटस्फोट न घेता कृतिकाबरोबर लग्न केले. कृतिका आणि पायल आता एकाच घरात राहतात. अशातच आता सोशल मीडियासह सर्वच माध्यमांवर त्याच्या चौथ्या लग्नाच्या चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता खरच त्याचं हे चौथं लग्न आहे का? नक्की खरी परिस्थिती काय आहे? याबाबत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. (armaan malik fourth wife)

सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्याबद्दल प्रत्येक अपडेट शेअर करताना मलिक कुटुंबिय कायमच दिसतात आणि त्यांनी करवा चौथचाही व्लॉग पोस्ट केला. त्यांच्या मुलांची केअरटेकर लक्षदेखील व्लॉग तयार करते आणि करवा चौथच्या दिवशी तिनेही व्लॉग रेकॉर्ड केला. तिचा व्लॉग पाहून नेटकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात आणून दिली की, तिच्या हातावरील मेहंदीमध्ये संदीप उर्फ अरमान मलिकचे नाव लिहिले आहे. याबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झालेलीदेखील दिसून आली. यावर आता अरमान व त्याच्या दोन्ही पत्नींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा – “व्ह्यूज, प्रसिद्धीच्या शोधात तुम्ही…”, ठाण्यातील कचरा दाखवताच शशांक केतकरला नेटकऱ्याचा टोला, अभिनेता म्हणाला, “राजकारणी लोक…”

View this post on Instagram

A post shared by Payal Malik (@payal_malik_53)

सोशल मीडियावर चर्चा झाल्यानंतर अरमानने सांगितलं की, “लोक म्हणत आहेत की अरमान त्याच्या दोन्ही पत्नींबरोबर राहत असतानादेखील तिसरे लग्न केले आहे. लक्ष्यच्या हातावर संदीप असे लिहिले आहे. लक्ष्य सरदार कुटुंबातील आहे. त्यामुळे संदीप पुरुष किंवा स्त्रीदेखील असू शकतो. तसेच तिने संदीप लिहिले आहे ते कशावरून माझेच नाव आहे? कदाचित लक्ष्यचा   संदीप नावाच्या मुलाबरोबर साखरपुडाही झाला असेल. तिचे आयुष्य, तिची मर्जी. प्रत्येक गोष्टीमध्ये माझं नाव घेणं गरजेचं आहे का?”.

आणखी वाचा – बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी, ‘त्या’ व्यक्तीला अटक

यानंतर पायल म्हणाली की, “आम्हाला ट्रोल केलं जात आहे. आम्ही दोन बायका असूनही तिसऱ्या बायकोला परवानगी कशी दिली? असा प्रश्न सगळेजण विचारत आहेत. सगळं सहन करायला आम्ही वेडे नाही आहोत. लक्ष्यने संदीप नाव का लिहिले? हे मी तिला स्वतःला सांगायला लावेन”. दरम्यान आता या सगळ्यावर लक्ष्य काय म्हणाणर याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags: Armaan malikfourth wifeyoutuber
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Sonu Nigam Concert Video

Video : स्टेजवर गात असताना अचानक आली 'ती' व्यक्ती, बॉडीगार्डने मागे करत बेदम मारहाण केली अन्…; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.