रॅपर एमसी स्टॅन हा नेहमी चर्चेत असतो. हिंदी मधील प्रसिद्ध कार्यक्रम ‘बिग बॉस’च्या सोळाव्या पर्वात तो दिसून आला होता. तसेच तो या पर्वाचा विजेताही झाला होता. देशभरात त्याचे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावरदेखील तो मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. तो नेहमी स्वतःचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशातच आता त्याच्याबद्दलची एक नवीन अपडेट समोर आली आहे. मुंबईपासून नाशिक, सूरतपर्यंत त्याचे गायब होण्याचे पोस्टर लागले आहेत. हे पोस्टर पाहून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता सगळ्यांचेच लक्ष याकडे वळले आहेत. (mc stan missing)
एमसी स्टॅन गायब असल्याचे पोस्टर पाहून त्याचे चाहते बुचकळ्यात पडले आहेत. त्याच्याबरोबर काही चुकीचं घडलं की काय? असा प्रश्नदेखील त्याच्या चाहत्यांना पडला आहे. त्याने गेल्या तीन आठवड्यांपासून एकही पोस्ट शेअर केली नव्हती. तसेच काही महिन्यांपूर्वी त्याचे त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर ब्रेकअपही झाले होते. त्याचे दु:ख हे नेहमीच सोशल मीडियावर त्याच्या पोस्टच्या माध्यमातून दिसून येते.
मात्र हा एक पीआर स्टंट असल्याचेदेखील त्याच्या चाहत्यांनी म्हंटले आहे. कारण लावलेल्या पोस्टरमध्ये एमसी स्टॅन सापडला तर कोणाला संपर्क करायचा याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे हा प्रकार नक्की काय? याबद्दल मात्र सगळ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान एमसी स्टॅनचे इन्स्टाग्रामवर १०.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. तसेच तो कोणालाही फॉलो करत नाही. त्याने २ सप्टेंबर २०२४ रोजी शेवटची पोस्ट केली होती.
एमसी स्टॅन आता २५ वर्षांचा आहे. त्याचे खरं नाव अल्ताफ शेख आहे. २०१८ साली वाटा या गाण्यामुळे अधिक प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर २०२० साली त्याचा ‘तडीपार’ अल्बम खूप हिट झाला होता. त्याच्या शरीरावर अनेक टॅटू आहेत. त्याच्याकडे १.५ कोटी रुपयांची अलिशान कार आहे. तसेच त्याच्या गळ्यातील नेकलेसची किंमतदेखील दीड कोटी रुपये असल्याचे बोलेल जाते.