Seema Deo Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. आज सकाळी वांद्रे येथीर राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ८१ वर्षांच्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या अल्झायमर या गंभीर आजारामुळे त्रस्त होत्या. तीन ते चार वर्षांपासून या आजारामुळे त्या अधिक थकल्या असल्याचं त्यांचा मुलगा अजिंक्य देवनेही सांगितलं. आता त्यांच्या अंतिम दर्शनाला सुरुवात झाली आहे.
वांद्रे येथील राहत्या घरीच सीमा देव होत्या. त्यांचं पार्थिव आता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये नेण्यात आलं आहे. इथेच सीमा देव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. वांद्रे येथील राहत्या घरी कलाक्षेत्रातील अनेक मंडळींनी सीमा यांच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थिती दर्शवली होती.
अजिंक्य देव तर पूर्णपणे कोलमडून गेला आहे. आईच्या पार्थिवाच्या शेजारी बसून तो सीमा देव यांच्याकडे एकटक पाहत होता. यावेळी त्याला अश्रू अनावर झाले. तसेच अजिंक्यचा भाऊ अभिनय देवही आईच्या पार्थिवाच्या शेजारी बसला. यावेळी दोन्ही भावांना रडताना पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
यावेळी गायक अजय गोगवलेही उपस्थित होता. दादर येथील स्मशानभूमीमध्ये नेण्यासाठी सीमा देव यांचं पार्थिव त्याच्या इमारतीखाली आणण्यात आलं. इमारतीच्या परिसरामध्ये अनेकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. तसेच काही वेळासाठी इमारतीच्या परिसरामध्ये अंतिम दर्शनासाठी सीमा देव यांचं पार्थिव ठेवण्यात आलं. दरम्यान सीमा देव यांना पाहून कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला.