शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा धक्कादायक मृत्यू, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, नेमकं काय झालं?

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 4, 2024 | 9:33 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Famous Kannada director guruprasad dies body found hanging from fan at flat see the details

प्रसिद्ध कन्नड दिग्दर्शकाचा मृत्यू, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद व धक्कादायक बातमीसमोर येत आहे, ती म्हणजे प्रसिद्ध कन्नड चित्रपट दिग्दर्शक गुरुप्रसाद यांचा मृत्यू झाला आहे. ते ५२ वर्षांचे होते. (रविवार, ०३ नोव्हेंबर) रोजी त्यांचा मृतदेह घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच ते गेल्या आठ महिन्यांपासून उत्तर बेंगळुरूमधील मदननायकनहल्ली येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. लोकांना दुर्गंधी आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Director Guruprasad Death)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटमधील पंख्याला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक (बंगळुरू ग्रामीण) सीके बाबा यांनी याबद्दल असं म्हटलं आहे की, “चित्रपट निर्माता गुरुप्रसाद काही गोष्टींबद्दल नाराज होते, मग ते त्यांच्या चित्रपटाबद्दल असो किंवा इतर गोष्टींबद्दल. ते काही आर्थिक तणावाशीही झुंजत होते. पाच-सहा दिवसांपूर्वी त्यांना या घरात येताना शेजाऱ्यांनी पाहिले होते. तेव्हापासून ते बाहेर गेला नव्हते. त्यामुळे पाच-सहा दिवसांपूर्वी गळफास लावून त्यांचा मृत्यू झाला असावा”.

View this post on Instagram

A post shared by Guruprasad Mata (@directorguruprasad)

आणखी वाचा – ऋता दुर्गुळेचं लग्नाबाबत भाष्य, मुलांमधील हे गुण पाहून दिला लग्न करण्याचा सल्ला, म्हणाली, “निर्णय घेण्याच्या बाबतीत…”

‘फायनान्शिअल एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुप्रसाद यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. त्याच्या शेजाऱ्यांनी अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केल्यावर पोलिस तिथे पोहोचले. पोलिसांना त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. दरम्यान, गुरुप्रसाद यांच्या निधनाचे वृत्त येताच कन्नड कलाकार व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ही बातमी ऐकून त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या अनेकांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा – 04 November Horoscope : सर्वार्थ सिद्धी योगामुळे कर्क आणि कन्या राशीसह ‘या’ राशीच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश, जाणून घ्या…

गुरुप्रसाद यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, २००६ मध्ये ‘माता’ चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं. यानंतर ‘एडेलू मंजुनाथ’ हा दुसरा चित्रपट केला. गुरुप्रसाद रिॲलिटी टीव्ही शो ‘डान्स कर्नाटक डान्स’चे परिक्षक होते. तसेच त्यांनी ‘बिग बॉस कन्नड २’ मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणूनही भाग घेतला होता.

Tags: Director Death Guruprasad NewsDirector Guruprasad DeathKannada Director Guruprasad Death News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
Paaru Marathi Serial Update

Paaru Marathi Serial : पारू-सावलीमुळे आदित्यचं आयुष्य उध्वस्त होता होता वाचलं, अहिल्यादेवींनी मानले आभार, दामिनीचं कटकारस्थान सुरुचं अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.