शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुपरस्टार रजनीकांतच्या ‘जेलर’चा ट्रेलर आला समोर, अभिनेत्याचा अॅक्शनपॅक अंदाज पाहून चाहते खुश

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 3, 2023 | 5:04 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
rajanikanth's jailer trailer out

rajanikanth's jailer trailer out

साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुचर्चित ‘जेलर’ चित्रपटाचा ट्रेलर नुकतंच समोर आला आहे. ज्यात रजनीकांतचा अॅक्शनपॅक अंदाज पाहून चाहते प्रचंड खुश झाले आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली असून ‘जेलर’मध्ये रजनीकांतची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांवर चालणार का ? हे पाहायला मिळणार आहे. (rajnikanth’s jailer trailer out)

‘जेलर’च्या ट्रेलरची सुरुवात जबरदस्त अॅक्शन आणि गोळीबारीने होते. चित्रपटाची कथा एका जेलरची असून ज्याच्या तुरुंगात एका खतरनाक टोळीचा म्होरक्या कैद आहे. त्या टोळीतील माणसे जेलरच्या तुरुंगातून म्होरक्याची सुटका करण्यासाठी धोकादायक योजना आखतात. जेलर मुथुवेल अत्यंत कडक स्वभावाचे पण प्रामाणिक असतात. पण त्या जेलर आणखी एक रूप आहे जी खूप भयानक आहे. आणि ते रूप त्यांच्या घरातील कोणत्याही सदस्यांना माहित नसते.

चित्रपटात रजनीकांतचा अवतार पाहून चाहते फारच खुश झाले असून ट्रेलरमधील अॅक्शन सीन्स पाहताना अंगावर अक्षरशः काटा येत असल्याचे चाहते सोशल मीडियावर बोलतायत. सुपरस्टार रजनीकांतच्या या चित्रपटात अभिनेते जॅकी श्रॉफ, मोहनलाल, शिवा राजकुमार, तमन्ना, राम्या कृष्णन व अन्य कलाकार दिसणार आहेत. (rajnikanth’s jailer movie)

चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीप कुमार यांनी केलं आहे. ज्यांनी याआधी थलापती विजयच्या ‘बीस्ट’ चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट येत्या १० ऑगस्टला तामिळसह हिंदी, कन्नड आणि तेलगू भाषेत रिलीज होणार आहे. (rajnikanth’s jailer movie)

Tags: jailer movierajanikanth's jailer trailer outrajnikanthsouth movies
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Komal Kumbhar Boyfriend

Komal Kumbhar Boyfriend: 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील अंजीचंही ठरलं! वाढदिवसाचं निमित्त साधत दिली प्रेमाची कबुली

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.