टेलिव्हिजनवरील सगळ्यात वादग्रस्त शो म्हणजे ‘बिग बॉस’. भांडणं, वाद विवाद, मारामारी यामुळे हा शो नेहमीच चर्चेत असतो. ‘बिग बॉस’ मराठी असो वा हिंदी प्रत्येक शोमध्ये स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’ हा रिऍलिटी शो वादामुळे नव्हे तर आणखी एका गोष्टीमुळे बरेचदा चर्चेत राहिलेला पाहायला मिळाला आहे. ते म्हणजे ‘बिग बॉस’ हा शो स्क्रिप्टेड आहे की नाही?. हा शो स्क्रिप्टेड असण्यावरुन अनेकदा चर्चा झालेली पाहायला मिळाली. मात्र आता एका ‘बिग बॉस मराठी’च्या स्पर्धकाने याबाबत केलेला खुलासा साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. (Tyagraj Khadilkar On Bigg Boss Marathi)
‘बिग बॉस’ हा शो स्क्रिप्टेड असतो का यावर काही स्पर्धकांनी समर्थन दिले तर काहींनी असे काही नसल्याचे म्हणत बाजू घेतली. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही या चर्चेवरुन द्विधा मनस्थिती असल्याचं पाहायला मिळालं. ‘बिग बॉस मराठी’च नवं पर्व सध्या धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. या नव्या पर्वातील स्पर्धक विशेष धुमाकूळ घालताना दिसत आहेत. त्यामुळे हा शो चर्चेत आहे. पण या शोच्या माजी स्पर्धकाने शोबद्दल खुलासा केल्याने या चर्चेला उधाण आलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या सिझन १ मध्ये त्यागराज खाडिलकरने वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एण्ट्री घेतलेली पाहायला मिळाली.
लोकप्रिय गायक त्यागराज खांडिलकर यानं हा शो स्क्रिप्टेड असल्याचं म्हटलं आहे. नुकतीच त्यागराजने ‘बातों बातों में’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यागराजला रिऍलिटी शोसंदर्भात विचारण्यात आलं होतं. तेव्हा त्यानं रिऍलिटीमध्ये आधीच अनेक गोष्टी ठरलेल्या असतात, असं म्हटलं. याबाबत बोलताना त्यागराज असे म्हणाला की, “रिऍलिटीमध्ये आधीच अनेक गोष्टी ठरलेल्या असतात.
आणखी वाचा – लग्नासाठी तयार सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, दोनवेळा घटस्फोट झालेल्या अभिनेत्याशी लग्नगाठ बांधणार
‘बिग बॉस’मध्येही सगळं काही ठरेललं असतं. स्पर्धकांच बोलणं असतं ते त्यांना हवं तसं एडिट करण्यात येतं. २४ तास कॅमेरे सुरु असतात, पण एका तासात त्यांना जे दाखवायचं तेच दाखवलं जातं. टीम ए आणि टीम बी यांच्या बद्दल काय दाखवायचं, कोणाच्या बाजूने दाखवायचं हे देखील ठरवलं जातं. वोटिंग वगैरेचा काही फरक पडत नाही. इतकंच नाही तर या शोचा विजेताही आधीच ठरलेला असतो”, असा गौप्यस्फोटही त्यागराजनं केला.