Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पुन्हा एकदा निक्की तांबोळीचा राडा पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात निक्कीने चांगलाच धुमाकूळ घातला आता पुन्हा एकदा निक्की व घरातील स्पर्धकांमध्ये बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. यादरम्यान पुन्हा एकदा निक्कीने घरच्या कॅप्टन वर्षा उसगांवकर यांचा अपमान केला. निक्की कॅप्टन वर्षा यांना “मी वॉशरुम स्वच्छ करणार नाही” असं सांगते. पुढे ती म्हणते, “सूरजने निकष समजून न घेता मला नॉमिनेट केलं. तुम्ही माझ्यासाठी स्टॅण्ड घेतला नाही त्यामुळे मी घरात ड्युटी करणार नाही”, असं कारण देत ती वर्षा यांना ठरवते. त्यांनतर घरात एकही काम करणार नाही असा निश्चय निक्की करते. “वॉशरुम स्वच्छ कर” असं आर्याने सांगून देखील निक्की काम करण्यास नकार देते. त्यानंतर घरातले सगळेजण तिच्याविरोधात एकत्र येतात.
यावर वर्षा म्हणतात, “नॉमिनेशन व ड्युटीचा संबंध नाही. तू वॉशरुम धुणार नाहीस म्हणजे. यात काहीच लॉजिक नाही. तुला केवळ निमित्त म्हणून हे करायचंय. तुझा लहरी स्वभाव आहे आणि आता तू खरंच कहर करतेस”. यावर पॅडी म्हणतो, “मग आता ज्या-ज्या गोष्टी घरात येतील त्या फक्त घरातल्यांनी वापरायच्या”. यानंतर निक्की पुढे, “हा निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही. कॅप्टनला पद सोडायला सांगा. असा कॅप्टन काय कामाचा?” असं म्हणत वर्षा यांचा अपमान करते. “काम केलं नाहीस, तर घरात ज्या गोष्टी येतात त्या तुला वापरायला देणार नाही”, असा निक्की विरोधातील सूर घरात पाहायला मिळतो. घराची कॅप्टन वर्षा असल्याने निक्की त्यांना सांगते की, “आता तुम्ही एक शब्दही का नाही बोलत? हे लोक म्हणतात रेशन देणार नाही हे योग्य आहे का? मी सगळं वापरणार कोणीही माझ्यावर जबरदस्ती करु शकत नाही”.
वर्षा या भांडणांदरम्यान निक्कीला सांगतात, “तू वॉशरुम स्वच्छ केले नाहीस, तर खरं म्हणजे तिथेही तुला जाण्याचा अजिबात अधिकार नाही. तू हा बाहेरचा बाथरुम वापर. आतमध्ये तुला अधिकार नाही. हा सगळ्यांचा निर्णय आहे”. वर्षा यांना उलट उत्तर देत निक्की म्हणते, “तुमच्यासमोर मी आत बाथरुममध्ये जाऊन दाखवेन. मला अडवणारा अजून जन्माला आलेला नाही. तुम्ही मला हुकूम देऊ नका. कॅप्टन आहात, तर कॅप्टनच राहा. इथे बादशाह नका होऊ. माझा बाप बनू नका. समजलं ना? कॅप्टनच्या हैसियतमध्ये राहा”, असं बोलते.
निक्की व वर्षा यांच्यात झालेला हा वाद पाहून आता प्रेक्षकांमध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळत आहे. वर्षा यांच्या वयाचा मन ठेवून निक्कीने काय बोलावं हे ठरवलं पाहिजे असं म्हणत अनेक नेटकऱ्यांनी कलर्स मराठी वाहिनीवरुन शेअर केलेल्या पोस्टखाली कमेंट केल्या आहेत. अभिनेता पुष्कर जोगने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “स्पष्ट बोलायला लोक घाबरतात. बाजूने उभा राहा. कोणाला घाबरत आहात?, वर्षा ताईवर असं ओरडणं कसं सहन करु शकता?, लाज वाटली पाहिजे. बाजूने उभे राहा”, असं म्हणत वर्षा यांना पाठिंबा दर्शविला आहे. “निक्कीला सर्वात आधी बाहेर काढा”, “मराठी बिग बॉस एवढा कमजोर आहे की निक्कीपुढे हरला”, ” निक्कीला आता जेल झाली पाहिजे सुरवातीपासून ती नियम मोडत आहे तरी तुम्ही तिला बोलत नाही”, “निक्कीने मराठी बिग बॉस विकत घेतला आहे वाटतं”, “निक्कीला आवरा बिग बॉस उर्मट बाई”, अशा अनेक कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे.