गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मुलांची काळजी घेणं, प्रेम-आदरानं मनं जिंकणं…”, बायकोच्या वाढदिवसाला भरभरुन बोलला रितेश देशमुख, म्हणाला, “जिनिलिया तू…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 5, 2025 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
genelia deshmukh birthday celebration

“मुलांची काळजी घेणं, प्रेम-आदरानं मनं जिंकणं…”, बायकोच्या वाढदिवसाला भरभरुन बोलला रितेश देशमुख, म्हणाला, “जिनिलिया तू…”

genelia deshmukh birthday celebration : बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख. रितेश व जिनिलियाने आजवर स्वतःचं असं स्थान सिनेविश्वात आणि प्रेक्षकांच्या मनात स्थापन केलं आहे. महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी अशी ओळखही दोघांना मिळाली आहे. नेहमीच रितेश व जिनिलिया सोशल मीडियावर सक्रिय असतात. काही ना काही शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच जिनिलियाच्या वाढवदिवसानिमित्त रितेशने इंस्टाग्राम अकाउंटवर खास फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली आहे.

जुन्या फोटोंसह रितेशने बायकोला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे की, “माझी बायको, माय लव्ह…तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज फक्त तुझा वाढदिवस नाही आहे, तर हा दिवस मला कायम आठवण करुन देतो की, मी किती भाग्यवान आहे. तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस. मला कायम आनंदी ठेवणारी, आपल्या मुलांची काळजी घेणारी, प्रेम व आदराने सर्वांचं मन जिंकून घेणारी, माझी मैत्रीण आणि सर्वकाही. जिनिलिया तू कुटुंबातील प्रत्येकासाठी खूप काही करतेस, आम्हाला सगळ्यांना कायम आनंदी ठेवतेस. जरी प्रचंड थकलेली असशील तरीही कोणाला काय हवंय, काय नकोय याकडे तुझं नेहमी लक्ष असतं”.

आणखी वाचा – कॅन्सरवर मात करुनही हा आजार पुन्हा होईल ही भीती कायम, सोनाली बेंद्रेचं धक्कादायक भाष्य, म्हणाली, “लपवून…”

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

पुढे रितेश म्हणाला, “तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चिअरलीडर आहेस. जी मला कायम पाठिंबा, प्रोत्साहन देते. तुझं घरात कायम हसत-खेळत वावरणं, सर्वांवर प्रेम करणं, मित्रांबरोबर आपण एकत्र घालवलेला वेळ. एकंदर काय, तर तू माझ्या आयुष्यातील अशी एकमेव व्यक्ती आहेस, जिच्यावर मी प्रत्येक गोष्टीसाठी अवलंबून राहू शकतो. तू मला प्रत्येक गोष्टीसाठी मार्ग दाखवला आहेत, आयुष्याच्या विविध टप्प्यात तू माझी उत्तम सहकारी आहेस. आमच्या कुटुंबाचं तू हृदय आहेस, आपली मुलंही प्रत्येक गोष्ट सर्वात आधी तुला सांगतात. आजचा हा खास दिवस तू स्वतः साठी साजरा कर”.

आणखी वाचा – शहनाज गिलची प्रकृती बिघडली, उपचारासाठी अभिनेत्री रुग्णालयात दाखल, करणवीर मेहराने दाखविली झलक

पुढे त्याने म्हटलं, “जिनिलीया आज तुझ्यामुळे मी एक चांगला माणूस, एक चांगला जोडीदार बनू शकलो आणि यासाठी तू मला कायम प्रेरणा दिलीस. तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी मी सर्वात जास्त देवाचे आभार मानतो. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे बायको. मी आज माझे शब्द पूर्णपणे व्यक्त करु शकत नाही, कारण यापेक्षा तू माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहेस. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि खूप प्रेम जिनिलीया”,असं म्हणत रितेशने जिनिलीयाबरोबरचे १० फोटो शेअर केले आहेत. यात त्यांचा जुना फोटो, शूटिंगच्या सेटवरचा फोटो, रियान व राहील या दोन्ही मुलांबरोबरच्या फोटोंचा समावेश आहे.

Tags: entertainmentgenelia deshmukhriteish deshmukh
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
shiva serial off air

शूटिंगचा अखेरचा दिवस अन् डोळ्यांत पाणी, 'झी मराठी'ची लोकप्रिय मालिका 'या' दिवशी घेणार निरोप, कलाकार भावुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.