रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शूटिंगचा अखेरचा दिवस अन् डोळ्यांत पाणी, ‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका ‘या’ दिवशी घेणार निरोप, कलाकार भावुक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 5, 2025 | 12:20 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
shiva serial off air

शूटिंगचा अखेरचा दिवस अन् डोळ्यांत पाणी, 'झी मराठी'ची लोकप्रिय मालिका 'या' दिवशी घेणार निरोप, कलाकार भावुक

shiva serial off air : मालिका जशा रसिकांचं मनोरंजन करत असतात त्याप्रमाणे काही काळानंतर त्या प्रेक्षकांचा निरोपही घेतात. बरीच वर्ष रोज एका वेळेत प्रदर्शित होणारी एखादी मालिका ऑफ एअर जाते तेव्हा मात्र प्रेक्षकांचा कुठेतरी हिरमोड होतो. नव्या मालिकांची घोषणा झाली असली तरी कुठेतरी आपली रोजची मालिका, रोजचे चेहरे दिसणार नाहीत याने प्रेक्षक नाराज असतात. बरेचदा ही मंडळी मालिका सुरु ठेवा असा आग्रहही करतात मात्र टीआरपीच्या दृष्टिकोनातून चॅनेलद्वारे मालिकांमध्ये होणारे बदल हे कायम असतात म्हणून त्या मालिकांना निरोप हा घ्यावाच लागतो. अशातच झी मराठी वाहिनीवर ‘तारिणी’ आणि ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

या नव्या मालिकांची घोषणा होताच झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेली शिवा ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. गेल्यावर्षीच झी मराठी वाहिनीवर शिवा ही मालिका प्रसारित झाली. वर्ष-दीड वर्षातच या मालिकेने प्रेक्षकांना आपलंस केलं. मालिकेच्या कथानकाने रसिकांची मनं जिंकली. तर कलाकारांनीही त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांवर राज्य केलं. ‘शिवा’ या मालिकेतून पूर्वा कौशिकने रसिकांच्या मनावर राज्य केलं.

आणखी वाचा – शहनाज गिलची प्रकृती बिघडली, उपचारासाठी अभिनेत्री रुग्णालयात दाखल, करणवीर मेहराने दाखविली झलक

अशातच आता शिवाने म्हणजेच पूर्वा कौशिकने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शूटिंगच्या शेवटच्या दिवसातील काही खास क्षण शेअर केले आहेत. पूर्वाने मालिकेच्या सेटवरील शेवटच्या दिवसाचा भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये पूर्वा शिवा या भूमिकेसाठी लावणारा विग काढताना दिसत आहे. त्यावेळी तिच्या डोळ्यांत पाणी दिसत आहे. शिवा या भूमिकेसाठी पूर्वाने तिचे केस कापले होते. मात्र ते भूमिकेला सेट झाले नाहीत म्हणून तिला विग वापरावा लागला.

आणखी वाचा – “मुलांची काळजी घेणं, प्रेम-आदरानं मनं जिंकणं…”, बायकोच्या वाढदिवसाला भरभरुन बोलला रितेश देशमुख, म्हणाला, “जिनिलिया तू…”

“शेवटचा दिवस…शिवाच्या भूमिकेतून निरोप घेत आहे”, असं कॅप्शन देत तिने व्हिडीओ शेअर केला आहे. ‘शिवा’ मालिकेचा शेवटचा भाग हा ८ ऑगस्टला प्रसारित होणार आहे. आणि या मालिकेऐवजी ‘झी मराठी वाहिनी’वर ‘तारिणी’ ही मालिका प्रसारित होणार आहे.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Dipika Kakar Health

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करने गाठलं स्वयंपाकघर; पहिल्यांदाच बनवली 'ही' खास डिश, सासऱ्यांकडून कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.