शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सूनेचा चित्रपट पाहून सासूबाई भावुक, नम्रता संभेरावही सगळ्यांसमोर रडू लागली, म्हणाली, “हा क्षण माझ्यासाठी…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 5, 2023 | 4:17 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
ekda yeun tar bagha marathi movie main lead namrata sambherao and her family gets emotional after premiere watch video

सूनेचा चित्रपट पाहून सासूबाई भावुक, नम्रता संभेरावही सगळ्यांसमोर रडू लागली, म्हणली, "हा क्षण माझ्यासाठी..."

सध्या मराठीमध्ये ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रिमियर सोहळा पार पडला. प्रसाद खांडेकर दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रिमियरला मराठीतील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. शिवाय चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी नम्रता संभेराव तिच्या कुटुंबियांसह हजर होती. यावेळी नम्रताच्या कुटुंबियांनी तिचं भरभरुन कौतुक केलं. तिच्या सासूबाईंनाही सूनेचा अभिमान वाटला. यावेळी कुटुंबाचं आपल्यावर असणारं प्रेम पाहून नम्रताला अश्रू अनावर झाले. (Namrata Sambherao Interview)

‘इट्स मज्जाला’ दिलेल्या मुलाखतीत नम्रता अगदी खुलेपणाने व्यक्त झाली. नम्रताला मोठ्या पडद्यावर पाहिल्यानंतर तिच्या आईने तिचं तोंडभरुन कौतुक केलं. नम्रताची आई म्हणाली, “मुख्य भूमिका असलेला तिचा पहिलाच चित्रपट आहे. आम्हाला खूप छान वाटत आहे. आम्हाला नम्रताचा अभिमान आहे”. त्याचबरोबरीने नम्रताच्या सासूबाईंनीही ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या प्रिमियर सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदही पाहण्यासारखा होता. सासूबाईंनी सूनेच्या चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक करत तिला शाबासकी दिली.

आणखी वाचा – “काही दिवस तब्येत ठिक नसल्यामुळे…”, लग्नानंतरच्या पहिल्याच मुलाखतीत अमृता देशमुख व प्रसाद जवादेचं भाष्य, म्हणाली, “नवरा-बायको म्हणून…”

नम्रताच्या सासूबाई म्हणाल्या, “नम्रताचा चित्रपट अगदी छान आहे. विशेष म्हणजे सासू-सूनेपेक्षा मुलगी व आई म्हणून आमचं नातं अधिक चांगलं आहे”. नम्रताबाबत बोलताना तिच्या सासूबाई अगदी भावुक झाल्या. तसेच नम्रताच्या वडिलांनीही तिचं कौतुक केलं. “नम्रताचा चित्रपट कसा वाटला?” असं विचारण्यात आल्यावर तिचे वडील म्हणाले, “चित्रपट एकदम मस्त आहे. खूप छान वाटलं. मला माझ्या मुलीची अभिमान आहे”.

आणखी वाचा – Video : प्रसाद खांडेकर बोलत असताना कॅमेऱ्यासमोरच गौरव मोरेला अश्रू अनावर, अभिनेता रडला अन्…; म्हणाला, “कोणतंही काम असं तरीही…”

त्याचबरोबरीने नम्रताचा पती योगेशनेही चित्रपटातील तिच्या भूमिकेचं तोंडभरुन कौतुक केलं. कुटुंबाने केलेलं कौतुक ऐकून नम्रताला रडू कोसळलं. नम्रता म्हणाली, “माझ्यासाठी हा भावनिक क्षण आहे. कारण पहिल्यांदाच कुटुंबातील सगळे चित्रपटाच्या प्रिमियरला आले आहेत. मी आतापर्यंत हेच म्हणत आले आहे की, हा चित्रपट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण मुख्य भूमिका असलेला माझा पहिलाच चित्रपट. हा चित्रपट माझ्या कुटुंबाबरोबर मला बघायला मिळतो ही माझ्या खूप आनंदाची गोष्ट आहे”. नम्रता रडत असताना तिच्या सासूबाईंना तिला प्रेमळ आधर दिला. एकंदरीत नम्रताची प्रगती आणि आनंद पाहून कुटुंबियांच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य पाहायला मिळालं.

Tags: ekda yeun tar baghaentertainment newsmarathi actressmarathi entertainmentmarathi movieMarathi newsnamrta sambherao
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Next Post
Dunki drop 4 movie three trouble points

शाहरुख खानच्या 'डंकी'च्या ट्रेलरमधील या तीन चुका प्रेक्षकांना खटकल्या, लाखो व्ह्युज मिळाले पण नकारात्मक चर्चा, नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.