Bigg Boss Marathi 5 : सध्या छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी’चे नवीन पर्व चांगलेच चर्चेत आलं आहे. या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक तसेच त्यांच्यामध्ये सुरु असलेले वाद व भांडणं यामुळे हे नवीन पर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. यंदाच्या या पर्वात केवळ अभिनेता, अभिनेते यांनाच नव्हे तर रॅपर, कीर्तनकार, रील स्टार यांनाही स्पर्धक म्हणून संधी दिलेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ही स्पर्धक मंडळी अक्षरशः धुमाकूळ घालताना दिसत आहे. काहींना हा खेळ आवडला आहे तर काहीना या भांडणाचा त्रास होताना पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्या आठवड्यात कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांची एक्झिट झाली. त्यानंतर सलग दुसऱ्या आठवड्यात नॉमिनेशच टांगती तलावर स्पर्धकांवर असलेली पाहायला मिळाली. असं असलं तरी दुसऱ्या आठवड्यात कोणताच स्पर्धक घराबाहेर पडला नाही. त्यानंतर थेट तिसऱ्या आठवड्यात अभिनेता निखिल दामले व अभिनेत्री योगिता चव्हाण या दोन्ही स्पर्धकांचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला. आणि त्यांना घराबाहेर पडावं लागलं.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi मधील निखिल दामलेचा प्रवास संपला, नेमकं काय चुकलं?
निखिल व योगिता यांच्या एक्झिट नंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. नुकतीच निखिलने इट्स मज्जा या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना निखिलने अनेक प्रश्नाची उत्तरे दिलेली पाहायला मिळाली. यावेळी निखिलला घरात कोणत्या गोष्टीचा सर्वाधिक राग आला? असा प्रश्न निखिलला विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, “माणसं माणूसकी सोडून वागली तेव्हा मला खरंच राग आला. माझ मनंही तेव्हा दुखावलं. फार वाईट वाटलं. खासकरुन मी बेबी टास्कबाबत बोलत आहे. पलिकडच्या टीमकडून ज्याप्रमाणे बाळांना हाताळलं गेलं ते खूपच वेदनादायी होतं. मला स्वतःला ही गोष्ट पटली नाही. मला खात्री आहे की प्रेक्षकांनाही ही गोष्ट पटली नसेल”.
निखिल दामले हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. छोट्या पडद्यावर निखिलने महत्त्वपूर्ण कामगिरी करत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात येण्याआधी निखिल ‘रमा राघव’ या मालिकेत काम करत होता. ही मालिका संपल्यावर निखिलने ‘बिग बॉस’च्या घरात एण्ट्री केली. सर्व स्पर्धकांमध्ये निखिल हा सुरुवातीपासून शांतच होता.